12 लाख दिव्यांची रोषणाई, गिनीज बुकमध्ये होणार नोंद; अशी असेल अयोध्येतील यंदाची दिवाळी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:35 AM2021-11-03T10:35:55+5:302021-11-03T10:37:05+5:30
Ayodhya Deepotsav 2021: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर 2017 पासून अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अयोध्या: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर 2017 मध्ये अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या वर्षात 1,80,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. त्यानंतर 2018 मध्ये 3,01,152, नंतर 2019 मध्ये 5,50,000 आणि 2020 मध्ये 5,51000 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. पण, आता या वर्षी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम भव्य दिव्य असणार आहे. कारण, यंदा अयोध्येत विश्व विक्रमी रामाच्या चरणी विश्व विक्रमी 9 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तर, अयोध्येत 3 लाख दिवे लावले जातील, अशा प्रकारे एकूण 12 लाख दिवे प्रज्वलित होतील. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम त्यांची मोजणी करणार आहे.
अयोध्या दीपोत्सव 2021 वेळापत्र
बुधवारी अयोध्येत भव्य कार्यक्रम आयोजित केले जातील. सकाळी 10 वाजता प्रभू रामाची मिरवणूक व तबकडी काढण्यात येणार आहे. साकेत कॉलेजपासून सुरू होऊन रामकथा पार्कवर पोहोचेल. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यपाल आनंदी बेन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित असतील. कार्यक्रमात राम-सीतेचे हेलिकॉप्टरने आगमन, भरत मिलाप, रामायण चित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन होणार आहे.
दिवे कुठे लावणार?
अयोध्येत यंदा लावल्या जाणाऱ्या दिव्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. एकट्या रामाच्या चरणी सुमारे 9 लाख दिवे प्रज्वलित केले जातील. तसेच, रामजन्मभूमी संकुलात 51,000 दिवे प्रज्वलित केले जातील आणि अयोध्येतील प्राचीन मंदिरे आणि विविध ठिकाणी 3 लाखांहून अधिक दिवे लावले जातील. याशिवाय अयोध्येच्या 14 कोसी परिक्रमेतील जवळपास सर्व पौराणिक ठिकाणे, तलाव, मंदिरे येथे दिवे लावले जातील. एवढेच नाही तर अयोध्येशिवाय बस्ती जिल्ह्यातील माखोडा धामसह 84 कोसी परिक्रमेत येणाऱ्या अनेक ठिकाणी दिवे लावले जाणार आहेत. मखौडा धाम हे तेच ठिकाण आहे जिथे महाराज दशरथांनी पुत्रश्रेष्ठ यज्ञ केला होता. त्यानंतर राजा दशरथाच्या घरी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
दीपोत्सवात लाखो स्वयंसेवकांची निस्वार्थ सेवा
अयोध्येतील दिव्यांची रोषणाई दिसेल तेव्हा अनेक मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसेल. खरं तर ही तीच मुलं आहेत ज्यांनी या दिवाळीसाठी खूप मेहनत घेतली आहे. यावेळी दीपोत्सवात 45 स्वयंसेवकांव्यतिरिक्त, 15 महाविद्यालयांचे विद्यार्थी, 5 महाविद्यालये, राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या 35 विविध संस्थेतील मुले स्वयंसेवक म्हणून योगदान देत आहेत. त्यांची एकूण संख्या सुमारे 12 हजार आहे. एवढ्आ मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यासाठी तब्बल 36,000 लिटर तेल वापरले जाणार आहे.