प्रभुभक्तीमध्ये तत्परशील व्हावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 01:12 PM2020-08-18T13:12:56+5:302020-08-18T13:13:01+5:30
पर्युषण पर्वानिमित्त महावीर वाणी...
आजच्या युगात खूप काही जण लोक देवाची पूजा-अर्चा-अभिषेक करत नाहीत. जे की विधान आहे. पूजा-अर्चना करायचेच त्यांनी स्नात्र पूजा करणे पण आवश्यक आहे. प्रभुभक्तीमध्ये तत्परशील होऊन आत्म-शांती-समाधीचे अनुभव करायला पाहिजे. त्याचबरोबर उत्तमप्रकारे पूजेची सामग्री आणून देवांचे स्नात्र महोत्सव (अभिषेक) केले पाहिजे.
देवद्रव्य वृद्धीमध्ये तीर्थंकरांची माता १४ स्वप्ने बघतात. ते स्वप्नाद्वारे त्याचे चिन्ह म्हणून आजसुद्धा पर्युषणाच्या पाचव्यादिवशी भगवान महावीर जन्मवाचन म्हणून साजरा करतात. त्यात पर्युषण पर्वात स्वप्नाद्वारे नृत्य करून त्याचा लाभ घेऊन झुलतात. ती वृद्धी जी येते ती देवद्रव्य खाल्ले जाते. देवद्रव्य वृद्धी संरक्षण आदींमुळे जीव तीर्थंकर पदाची योग्यता बाळगू शकतो.
महापूजा ज्याप्रकारे गणपतीची आणि देवीची रोषणाईद्वारे करून सुशोभित करतात त्याचप्रमाणे जयणापूर्वक, पापरहित प्रभुभक्ती, सम्यकदर्शनच्या प्राप्तीसाठी भवीजीव आपल्या बुद्धीने महापूजा करतात.
रात्री जागरण- पर्युषण पर्वात प्रभू (भगवान महावीर) यांचा पारणा झुलवतात. ज्या पुण्यशालीच्या घरी तो जातो. दरवर्षी त्यांनी रात्री जागरण करून सकल जैनसंघ सोबत भक्तिभावाने करतात.
श्रुत भक्ती- प्रत्येक वर्षी ज्ञान म्हणजे श्रुत भक्ती / ज्ञानपंचमीचा दिवस ज्ञानासाठी शुभ मानला जातो. पुस्तके लिहिणे, पुस्तक देऊन मदत करणे, गरजूंना देऊन ज्ञानाची आराधना करणे.
उद्यापन- पर्वतीर्थांवर जे काही तपश्चर्या आहेत ज्ञानपंचमी, वर्धमान तप, रोहिणी इत्यादी वृत्त ज्ञानदर्शन चारित्रची म्हणजे रत्नत्रयींच्या शुद्धीसाठी उद्यापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार पैसे, वस्त्र, नारळ, पठण, पाठण ठेवणे आवश्यक आहे. तीर्थप्रभावना- ऊंचा से ऊंचा धर्मशासन म्हणजे जनसामान्य जनतेत हृदयात जैन धर्माची वास्तविकता समजावणे. समकीत प्राप्त होणे, त्यासाठी जल्लोषात पर्युषणात मिरवणूक काढतात. त्यात दान देण्याची भावनापण ठेवणे. शुद्धी - जर शहरात त्या काळात मुनी भगवंत, साध्वी भगवंत असले तर त्यांच्याकडून केलेल्या पापांची आलोचना करायला पाहिजे. जे गुरू भगवंत देतात स्वीकार करणे व पूर्ण करणे.
अशाप्रकारे विवेकशील श्रावक-श्राविका या कर्तव्याचे पालन करतात, आचरण करतात आणि धर्मानुसार चतुर आत्मा पुण्यवृष्टीद्वारे स्वर्गात सुखाची प्राप्ती करून परंपरेनुसार मुक्तीसुख प्राप्त करतात.
पौषध- पौषध म्हणजे संसारात असलेल्या सगळ्या वस्तूंचा एक दिवस त्याग, साधू बनकर रहना, जीवो में दया भाव रखना, जयणा का पालन करना, ऐसे पौषध पर्व के दिनों में करने का बडा महत्त्व है । व्रतधारी जीवका प्रत्येक पर्वतिथीवर पौषध करतात.
- रतनचंदजी जैन,
पिंकी कवाड