स्त्री-पुरुष विषमतेच्या पलीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:44 AM2019-08-07T05:44:25+5:302019-08-07T05:45:07+5:30

प्राचीन काळात, भारतात, विशेषत: आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात, स्त्री आणि पुरुष एकसमान म्हणून जगले

Beyond gender inequality | स्त्री-पुरुष विषमतेच्या पलीकडे

स्त्री-पुरुष विषमतेच्या पलीकडे

Next

- सदगुरू जग्गी वासुदेव

स्त्रियांचे शोषण आज जगात जर कोठेही थांबवायचे असेल, तर ते काम समाजाशी निगडित नाही. ते काम खुद्द स्त्रियांच्या हातीच आहे. आपल्या एकूण लोकसंख्येतील सुशिक्षित स्त्रिया, ज्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व घडविले आहे, असा छोटासा वर्ग वगळला, तर इतर सर्वत्र स्त्रियांकडे दुय्यम म्हणूनच पाहिले जात आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, कोठेतरी पुरुषाच्या मनात, एक स्त्री म्हणजे एक क्षुद्र गोष्ट म्हणून पाहिले जाते. पुरुषाच्या मनात खोलवर त्याला कुठेतरी असे वाटत असते की, पत्नीसाठी एखादी भेटवस्तू घेतलीत, तर सर्व काही सुरळीत होईल. मग साहजिकच, अलंकार, दागदागिन्यांसाठी उत्सुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे आपण स्वाभाविकपणे दुय्यम नजरेने पाहता.

दुर्दैवाने आज संपूर्ण स्त्रीवर्गाचे लक्ष; स्वेच्छेने म्हणा किंवा सांस्कृतिकदृष्ट्या, केवळ अशाच गोष्टींचा ध्यास घेण्यासाठी वळविले गेले आहे. प्राचीन काळात, भारतात, विशेषत: आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात, स्त्री आणि पुरुष एकसमान म्हणून जगले. जर एखाद्या व्यक्तीत आध्यात्मिक इच्छा जागृत झाली, तर पुरुष किंवा स्त्री संसारातून बाहेर पडू शकत होते. कारण त्या काळी अशी समजूत होती की, एकदा एखाद्या व्यक्तीने परमोच्चतेचा शोध घेण्याची इच्छा प्रदर्शित केली की, त्यांना आवश्यक ते सर्व स्वातंत्र्य द्यायला हवे होते. तर, एखादी स्त्री अशी आहे की, तिलासुद्धा परमोच्चतेचा शोध घ्यायचा आहे, तर मग स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत स्त्रीमुक्तीचा लढा देण्याची काहीही आवश्यकता नाही. सामाजिकदृष्ट्या, थोडा-फार लढा आवश्यक आहे. काहीतरी करणे आवश्यक आहे; कारण असे काही प्रस्थापित घटक आहेत, जे बदलणे आवश्यक आहे, पण एक स्त्री म्हणून तुमच्या स्वत:मध्ये, तुम्ही तुमची स्वत:ची ओळख केवळ एक स्त्री म्हणून जोडणे गरजेचे नाही.

Web Title: Beyond gender inequality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.