भक्ती ही परब्रह्माचीच

By Admin | Published: August 29, 2016 03:57 PM2016-08-29T15:57:30+5:302016-08-29T16:18:54+5:30

‘‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम’’ हे वारकरी संप्रदायाचे घोषवाकय आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस।’ अशी मांडणी आहे, परंतू संप्रदायाचा नकाश संत पुंडलिकाने तयार केला आहे.

Bhakti is only Parabrahmachich | भक्ती ही परब्रह्माचीच

भक्ती ही परब्रह्माचीच

googlenewsNext

- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा

‘‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम’’
हे वारकरी संप्रदायाचे घोषवाकय आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस।’ अशी मांडणी आहे, परंतू संप्रदायाचा नकाश संत पुंडलिकाने तयार केला आहे. म्हणून घोषवाक्यामध्ये पुंडलिक अग्रस्थानी आहे. भक्तीच्या मांडणीमध्ये भक्ती ही परब्रह्माचीच केली जाते. त्यामध्ये निष्कामतेची भूमिका प्रमुख असून भक्ती जीवनाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मोक्षासाठी केली जाते. ‘पुढे भक्तिने धरिले हाती । मागे ज्ञान वैराम्य येती।’’ यावरच आध्यात्मिक विकास अवलंबून आहे. गीतेतील भगवान, ब्रह्मतत्व जे निर्गुण निराकार आहे त्याला सगुण साकार बनवून विठ्ठल रुपामध्ये उभे करण्याचे सर्वोच्च कार्य पुंडलिकाने केले आहे.
यापेक्षा मोठे कार्य असून शकत नाही. संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात ‘‘नेणे ब्रह्म वाट चुकले । उघडे पंढरीसि आहेत।।
भक्त पुंडलिके देखिले । उभे केले विटेवरी।।
भक्तीमध्ये भ्रांत कल्पना शिरल्या होत्या. देहाला तुच्छ मानायचे, विश्वाला नाशिवंत समजायचे आणि कर्म बंधनकारक मानून कर्मत्याग, संन्यासाचा विचार करायचा. यामुळे गीतेचा कर्मयोग, स्वधर्म लोपला होता आणि समाज कामनायुक्त उपासनेत अनेक देवदेवतांमध्ये अडकला होता. पुंडलिकाने कर्माकडे आणि विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. त्याने आई - बापातच देव विराजमान आहे आणि आईबापाची सेवाच ईश्वराची सेवा आहे याची शिकवण प्रत्यक्ष अनुसरुन दाखविली. जो आईवडीलांच्या संदर्भात उदासीन असेल तो ईश्वर भक्तीच करु शकत नाही, असे ठाम सांगितले. समाजातील रुढी ग्रस्तता, निष्कर्मता आणि विश्वाकडे पाहण्याचा कोता दृष्टिकोन बदलविण्याचे मुख्य काम पुंडलिकाने केले. ‘‘महायोग पीठे तटे भीमरथ्या।
वरं पुंडरीकाय दातूं मुनीद्रै: ।। आद्य शंकराचार्य पुंडलीकाला मुनी असे संबोधितात. मुख्य म्हणजे हे विश्व आणि सर्वसृष्टी ईश्वराचाच अविष्कार आहे. त्याकडे पाहण्याची भोगरपदृष्टी चांगली नाही तसेच भक्तीच्या नावाखाली या सृष्टीला तुच्छ मानणारी दृष्टीही चांगली नाही, तर या विश्वाकडे पूजनीय भावाने पाहिले पाहिजे असा श्रेष्ठ संदेश भक्त पुंडलिकाने जगासमोर ठेवला. मानवाला कामनायुक्त विचार सरणी कडून निष्काम परोपकारी विचार सरणीकडे प्रवृत्त केले. मानवी देह कर्मप्रधान असून कर्म अटळ आहे ते केलेच पाहिजे. त्यावरच स्वत:चे जीवन चालते. तसेच सृष्टिचक्राची सुरळीतता मानवाच्या कर्मावरच अवलंबून आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती आहे.

Web Title: Bhakti is only Parabrahmachich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.