" क्रोधाची साखळी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 09:35 PM2020-05-02T21:35:56+5:302020-05-02T21:36:32+5:30

क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते..

"Chain of anger " | " क्रोधाची साखळी..."

" क्रोधाची साखळी..."

Next

डॉ.दत्ता कोहिनकर- (माईंड पॉवर ट्रेनर)
मित्रांनो, जगाच्या बाजारात  जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या ,समजा एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली त्याला झाप झाप झापले .  त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतुन खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय , पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच दाबून टाकतो .क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते. सायंकाळी हा कर्मचारी कामावरून घरी येतो ,त्याच्या आत दबलेली क्रोधाची ऊर्जा बाहेर पडण्यासाठी दिवसभर धडपडत असते. 
क्षणार्धात पत्नी काहीतरी गाऱ्हाणे सांगायला लागते, तत्क्षणी हा क्रोध बाहेर पडून पत्नीवर काढला जातो.
 पती हा परमेश्वर ,तो म्हणेल ती पूर्वदिशा हे आजपर्यंत स्त्रियांच्या मनावर बिंबवल आहे . त्यामुळे पतीच्या आरडाओरडीमुळे तिला आलेला क्रोध ती दाबून टाकते .तेवढ्यात मुलगा शाळेतून घरी येतो, पहाते तर काय, त्याचे सर्व कपडे मातीने मळलेले. यापूर्वी अनेकदा तो ग्राउंडवरून  मळलेल्या कपड्यानिशी घरी आलेला पण तिला कधीच क्रोध आला नव्हता.  आज मात्र ती नवऱ्याने तिच्या अंगावर टाकलेला क्रोध ती मुलाच्या अंगावर टाकते व त्याला बदडते .
 मुलगा आईला काय करणार? आईने मारल्यामुळे त्याला आलेला क्रोध तो पाटी किंवा वॉटर बॉटल किंवा खेळणे जोरात आपटून तोडतो व त्याचा क्रोध बाहेर काढतो .
मित्रांनो ही क्रोधाची साखळी अशा पद्धतीने कार्य करते. व घराघरात अशांतता निर्माण होते. वरपासून  क्रोध का खालपर्यंत वहन होतो .लॉक डाऊनचे नियम तोडल्यानंतर पोलिसांचा काठीचा प्रसाद जोरात मिळतो याचे कारण तुम्हाला आता लक्षात आले असेल. ऊर्जा नष्ट होत नाही तिचं वहन किंवा रूपांतर होत.
त्यामुळे क्रोधाची साखळी तोडायची असेल व ज्याला सुखी व्हायच असेल त्याने मनाचा व्यायाम करून मनाला सबल व संयमी बनवणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने ध्यान करणे ही काळाची गरज आहे. 
सध्याच्या व्यस्त जीवनशैली मध्ये मी तुम्हाला फक्त दहा मिनिटाचे आनापान सती ध्यान करावयाची विनंती करतो . हे ध्यान रोज सकाळ-संध्याकाळ करा.कुठल्याही पंथाचा, वर्णाचा ,संप्रदायाचा माणूस हे ध्यान करू शकतो. .यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल बुद्धिमत्ता वाढेल, चंचलता दूर होईल व भय दूर होईल .समता
युक्त मन , इंद्रियाचे व ऊर्जेचे व जीवनाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करू शकते. लॉकडाऊनच्या या काळात घरातच रहा .योग्य आहार घ्या. रोज व्यायाम करा व ध्यानधारणा करा...

Web Title: "Chain of anger "

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.