मनातील वाईट विचारांचे दहन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:44 PM2020-03-12T12:44:24+5:302020-03-12T12:44:34+5:30

होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव.

Combine bad thoughts in your heart | मनातील वाईट विचारांचे दहन करा

मनातील वाईट विचारांचे दहन करा

Next

श्रीरामपूर/साध्वी डॉ.प्रियदर्शनाजी 
होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव.
होळीचा पवित्र सण लक्षात घेऊन आत्मशुध्दी करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोठे जायचे, आपण कुठून आलो आहोत याचा गंभीर विचार करा. संत समाजाला सतत जागरुक करतात. आयुष्य थोडे आहे. क्रोध, मोह, माया आदी षडरिपुंचे दहन करुन जीवन सार्थकी लावा. आत्मलक्षी बना, क्षमायाचना करुन जीवनाचे सोने करा. वाईट विचारांमुळे आयुष्य बरबाद होते. वाईच विचार काढून टाकले तर आयुष्याला एक नवीन वळण लागते. मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होईल. आत्मस्वरुपाला जाणले पाहिजे. अज्ञानाचा अंधकार दूर करावा, ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, वेळेचा सदुपयोग करा जीवन सार्थकी लागेल. प्रत्येकाने दररोज धर्मग्रंथाचे एक पान वाचलेच पाहिजे. धर्माला राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आहे. धर्मावर राजकारणाचा प्रभाव वाढल्याने धर्म बदनाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Combine bad thoughts in your heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.