अध्यात्मात एकाग्रता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:36 AM2019-12-04T00:36:32+5:302019-12-04T00:38:08+5:30

‘जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दऱ्यात जा.’ डोंगर, दऱ्यांमध्ये कुठलीच आध्यात्मिकता नोही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे.

Concentration in spirituality | अध्यात्मात एकाग्रता

अध्यात्मात एकाग्रता

Next

-सद्गुरू जग्गी वासुदेव

असे लाखो लोक आहेत, ज्यांना वाटतं की, ते आध्यात्मिक मार्गावर आहेत, पण त्यात ते काहीच प्रगती करत नाहीत. याचे कारण हे आहे की, या मार्गात खरोखर काही घडण्यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे त्यात झोकून देणे गरजेचे आहे. स्वत:ला पूर्णपणे झोकून देणे याचा अर्थ असा नाही की, आपण आपले काम थांबविले पाहिजे. कुटुंबाचा त्याग किंवा इतर कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हा गैरसमज नेहमीच समाजात राहिला आहे. ‘जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दऱ्यात जा.’ डोंगर, दऱ्यांमध्ये कुठलीच आध्यात्मिकता नाही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे. तुम्ही तुमच्या आत जे काही करता, ते अध्यात्म आहे. तुमच्याबाहेर, बाह्य जगात तुम्ही काय करता, ते अध्यात्म नव्हे. तुम्ही कोठेही गेलात; शहरात राहात असाल किंवा हिमालयात... तुमचे आंतरिक जग हे सारखेच असते.
अध्यात्म हे आतल्या दिशेने टाकले जाणारे पाऊल आहे, एक असा आयाम जो तुमच्या वर्तमान अनुभव कक्षेबाहेर आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी वेगळ्याच पातळीची एकाग्रता लागते. तुम्हाला जर अनुभवात्मक आयामात पाऊल ठेवायचे असेल, तर आजपर्यंत तुम्ही करत असलेली सर्व व्यर्थ बडबड, तुमची धारणा, मान्यता असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्ही खरे किंवा खोटे समजत असलेल्या सर्व गोष्टी, हे सर्वकाही तुम्ही बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
तुम्ही स्वत:ला जे काही समजता किंवा जग तुम्हाला जे काही समजते, ते केवळ सामाजिकदृष्ट्या निगडित आहे. अस्तित्वाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. अस्तित्वाच्या दृष्टीने काही घडायला हवे असेल, तर तुम्ही त्याला पूर्णत: एका वेगळ्या मार्गाने सामोरे जाणे आवश्यक आहे. तुम्ही नुकतेच जन्माला आल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली, तरच हे साध्य होण्याची शक्यता आहे.

Web Title: Concentration in spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.