साधकावस्थेचा गाभा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:44 AM2019-05-18T00:44:43+5:302019-05-18T00:45:36+5:30

पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व.

The core of the seeker | साधकावस्थेचा गाभा

साधकावस्थेचा गाभा

Next

- वामनराव देशपांडे

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।
आचार्योपासनं शौचंंं स्थैर्यमात्मविनिग्रह: ।।गीता:१३:७।।
पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व. आपल्यापाशी ढोंंगीपणा असू नये. अदम्भित्व म्हणजे दिखाऊपणाने जगण्याचा पूर्ण अभाव. हिंसक मनोवृत्ती असू नये. अहिंंसा हा साधकावस्थेचा गाभा आहे. मन, वाणी आणि शरीर बलाने कुणालाही न दुखवणे, कुणाच्याही मनाला यत्किंंचितही इजा न करणे म्हणजे अहिंसा. क्षान्ति म्हणजे अपूर्व अशी क्षमावृत्ती. सरळ विनम्रवृत्ती, आर्जवी मनोवृत्ती, आपल्या सद्गुरूंच्या ज्ञानभारल्या आज्ञेत राहणे, गुरूसेवेत गर्क होणे, अंतर्बाह्य शुद्ध आचरण, विलक्षण स्थैर्य आणि मनावर पूर्ण ताबा हे गुण महत्त्वाचे आहेत. भगवंतांनी प्रस्तूत श्लोकातून सर्वच साधक भक्तांंना, साधकाचे एकूण व्यक्तिमत्त्व कसे असावे, त्याची मनोवृत्ती कशी असावी, भगवंतांशी तादात्म्य पावण्यात देहबुद्धी जी आड येते, तिला दूर कसे लोटावे, यावर उपदेश करताना, अगदी सहजपणे देहबुद्धीने जगणाऱ्या साधकांंना घेरून बसलेल्या दोषांंवर जणू प्रकाशच टाकला आहे. एकदा का प्रसिद्धीच्या झोतात माणूस आला की, मानीपणा अंगात संचारतो. तो नष्ट होण्यासाठी सत्पुरुषाचा सहवास लाभणे अत्यंत आवश्यक आहे. कारण संतपुरुषांना कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. त्यांच्यापाशीच अमानित्व नांंंंदत असते. अशी श्रेष्ठ संंतमंडळी इतरांचा सन्मान करण्यात धन्यता मानतात. अशा श्रेष्ठ पुरुषांंच्या सहवासात दीर्घकाळ राहिले तरच स्वत:मधले मानीपण लोप पावते.

Web Title: The core of the seeker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.