आनंदाचे डोही आनंद तरंग - अधोगतीचे जीवन परमात्म सुखाकडे न्यावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:13 PM2019-08-08T13:13:18+5:302019-08-08T13:13:44+5:30
संत विचारांच्या आधाराने मनुष्य जीवन सुखी होईल, आनंदी होईल.
- चैतन्य महाराज देगलूरकर, ज्येष्ठ कीर्तनकार
जीवन कसे जगावे, जीवनात सुख, आनंद कसे प्राप्त करावे, याचा सारासार विचार संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि रचनांमधून केला आहे. तसेच नामसाधनेचे महत्त्व संतांनी सांगितले आहे. संत साहित्यातून आपल्या जीवनाला पूरक असा विचार निवडला पाहिजे त्यातून आत्मकल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे़ संत श्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा अभंगगाथा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची ज्ञानेश्वरी आणि संतांचे ग्रंथ, साहित्य वाचायला हवेत. संत विचारांमध्ये जीवन आणि जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. संत विचारांच्या आधाराने मनुष्य जीवन सुखी होईल, आनंदी होईल. आजकाल मी आणि माझं यात सर्वसामान्य माणसं अडकली आहेत. मी पेक्षा आपण हा विचार रुजवायला हवा़ मनात सुरू असलेल्या कुठल्यातरी टप्प्यावर थांबले पाहिजे.