Dhanteras 2019 : धनत्रयोदशीला 'या' वस्तुंची खरेदी करणं मानलं जातं शुभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:30 PM2019-10-23T12:30:57+5:302019-10-23T12:44:50+5:30

धनत्रयोदशीला धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते. सोबतच या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने आणि वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचीही प्रथा आहे.

Dhanteras 2019 : Shubh Muhurat for buy these lucky things dhanteras | Dhanteras 2019 : धनत्रयोदशीला 'या' वस्तुंची खरेदी करणं मानलं जातं शुभ!

Dhanteras 2019 : धनत्रयोदशीला 'या' वस्तुंची खरेदी करणं मानलं जातं शुभ!

googlenewsNext

(Image Credit : timesnownews.com)

धनत्रयोदशीला धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते. सोबतच या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने आणि वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचीही प्रथा आहे. असं करण्यामागे अनेक मान्यता पूर्वीपासून पाळल्या जातात. या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सोन्या- चांदीचे दागिने

(Image Credit : indianjeweller.in)

धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी अनेकजण लक्ष्मी किंवा गणपतीची प्रतिमा असलेलं सोन्या- चांदींचं नाणंही खरेदी करतात. या नाण्यांची पूजा करतात. 

पितळेची भांडी 

(Image Credit : tinystep.in)

सोने- चांदीच्या दागिन्यांसोबतच या दिवशी पितळेच्या भांड्यांची खरेदी करण्याची देथील प्रथा आहे. पितळ हे देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा प्रिय धातू आहे. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजाही केली जाते. त्यामुळे पितळेच्या भांड्यांची खरेदी शुभ मानली जाते.

झाडू 

(Image Credit : amarujala.com)

पूर्वीपासून असं मानलं जातं की, झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. धनत्रोयदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्यानं घरात लक्ष्मी नांदते अशी मान्यता आहे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू उपयोगी असतो, त्याने घरातील अस्वच्छता नकारात्मकताही दूर होते, असे मानलं जातं. अनेकजण लक्ष्मीपूजना दिवशी झाडूची पूजा करतात. 

खरेदीचा मुहूर्त 

(Image Credit : trendymensolutions.com)

२५ ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपासून खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. हा मुहूर्त २६ ऑक्टोबर दुपारपर्यंत राहणार आहेत. ज्यांना केवळ धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी दुपारी  साडेचार ते रात्रीपर्यंत चांगला मुहूर्त आहे. 


Web Title: Dhanteras 2019 : Shubh Muhurat for buy these lucky things dhanteras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.