ध्यास पंढरपूरच्या विठ्ठलाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 05:05 AM2019-06-27T05:05:26+5:302019-06-27T05:05:44+5:30
आषाढी एकादशी जशी जशी जवळ येऊ लागली, वारीच्या बातम्या मिळू लागल्या, तसं मन बेचैन झालं. आपणही जावं पंढरपूरला? का इतकी पंढरीची ओढ. काय आहे तिथे एवढं
- शैलजा शेवडे
आषाढी एकादशी जशी जशी जवळ येऊ लागली, वारीच्या बातम्या मिळू लागल्या, तसं मन बेचैन झालं. आपणही जावं पंढरपूरला? का इतकी पंढरीची ओढ. काय आहे तिथे एवढं, की लाखो वारकरी तिथे मोठ्या भक्तीभावाने जातात. तिथे विठ्ठल आहे; पण विठ्ठलमूर्ती तर कित्येक देवळात असतात. मग या मूर्तीचे वैशिष्ट्य काय, पंढरपूरचे महत्त्व काय, तिथे क्लेशहारिणी चंद्रभागा आहे. पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती आहे, त्या मूर्तीची कुणी प्रतिस्थापना केली नाही. ती स्वयंभू आहे. प्रत्यक्ष परब्रम्ह, विठ्ठल आपल्या भक्ताला पुंडलिकाला भेटायला तिथे आले आहेत. थांबले आहेत.
उदंड देखिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे,
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे
ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे
आदि शंकराचार्य पांडुरंगाष्टक स्तोत्रात म्हणतात.
महायोगपीठे तटे भीमरथ्यां ।
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै:।
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ।
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम।
भीमरथी नदीवर म्हणजेच भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे योगपीठ असलेल्या ठिकाणी (पंढरपूर येथे) आपला भक्त पुंडलिकाला वर देण्यासाठी मोठमोठ्या ऋषिमुनींसह जो थांबला आहे, जो आनंदाचा कंद आहे, त्या परब्रम्हस्वरूप पांडुरंगाचे मी भजन करतो. पंढरपूरला महायोगपीठ का म्हणले आहे, तर तिथे हा योगी विठ्ठल आहे. ज्ञानेश्वरही त्याला योगी म्हणतात. योगी विठ्ठल भक्तांनाही योगी बनवतो. म्हणून ते स्थळ महायोगपीठ लुब्धली नादी लागली समाधी। मूढजन नरनारी लोकांरे
पंडितज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्ध साधकारे।।
असे पंढरीच्या वाळवंटातील दृश्य संतांनी वर्णिलेले आहे.