सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:51 PM2017-07-25T12:51:00+5:302017-07-25T16:32:15+5:30

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही.

Difficult to grieve easier to be happy - Part 8 | सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

Next

- सदगुरू श्री वामनराव पै
जीवनविद्या आत्मसात करतात ते सुखी होतात
तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही. कोणीही दुस-यांची निंदा करणार नाही.अशी दृष्टी असेल तर दुस-यांची चेष्टाकुचेष्टा कोणीही करणार नाही.असा दृष्टीकोन देणारे किती लोक समजामध्ये आहेत. असा दॄष्टीकोन घेणारे लोक समजात किती आहेत.समजा असा दृष्टीकोन देणारा एखाद -दुसरा जर असेल तरी तो घेणारे किती जण आहेत.आज जीवनविद्या मिशनमध्ये आपण लोकांना अचूक मार्गदर्शन करत आहोत.हे अचूक मार्गदर्शन तुम्हांला इतरत्र  कोठेही मिळणार नाही.शिवाय हे मार्गदर्शन जीवनविद्या मिशन वारंवार देत आहे.यातील वारंवार हा शब्द अंडरलाइन करायचा.इतके असूनसुध्दा  सदगुरु सांगतात त्याप्रमाणे सर्व लोक करतात का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.कारण एकाने मला प्रश्न विचारला की, “महाराज जीवनविद्येत आलेले सर्व लोक सुखी होतात का? मी त्याला म्हटले नाही.जे लोक जीवनविद्या आत्मसात करतात ते लोक सुखी होतात.सदगुरुंनी सांगितल्याप्रमाणे जे लोक आचरण करतात ते लोक सुखी होतात.पण हे तत्वज्ञान या कानाने ऐकतात व दुस-या कानाने सोडतात त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे.मला वाटते अशा लोकांबद्दल न बोललेच बरे.आम्ही सतत कर्मकांडावर अचूक असे मार्गदर्शन केलेले आहे तरी आमच्या मिशन मध्ये असलेले काही लोक देखील अजुनही कर्मकांडे करतात.असे लोक भितीपोटी हे सर्व करतात.पण सांगायला आनंद वाटतो की काही लोक आमच्या मार्गदर्शनानूसार सुधारले आहेत.त्यांनी निष्फळ कर्मकांडे करणे बंद केले आहे.एक काळ असा होता की आमचे नामधारक चार-पाच तास देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहायचे.कडेवर मूल असायचे पाऊस पडत असायचा तरी देखील ते अशा परिस्थितीत तासनतास रांगेत उभे असत.अशा परिस्थितीत जर मूल आजारी पडले, किंवा ती व्यक्ती आजारी पडली, त्याची बायको आजारी पडली तर डॉक्टरकडे जावे लागणार,पैसे खर्च होणार,त्याला दारिद्र येणार.आता या सर्व गोष्टींना जबाबदार कोण,याला जबाबदार केवळ ती व्यक्तीच असू शकते.शेवटी किती वेळ उभे रहाणार,शरीर थकणारच,गुडघ्यावर अति वजन आले की  ते त्रास देऊ लागतात.हे मी इथे का सांगतो आहे.माणसे विचार करत नाहीत, चिंतन करत नाही,एखाद्या गोष्टीच्या मुळाकडे जात नाहीत.आपल्या जीवनांत दु:ख का येत.खरंतर आपल्या दु:खाला कारणीभूत आपण आहोत की इतर कोणीतरी कारणीभूत आहेत.तुम्ही म्हणाल आपल्या दु:खाला इतर कुणीतरी कारणीभूत असू शकते का? तर हो दुसरे देखील कारणीभूत असू शकतात.काही लोक दुष्ट असतात.तुकाराम महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे आयुष्यभर त्रास भोगावा लागला.ज्ञानेश्वर महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे जन्मापासून त्रास भोगावा लागला.आता हा प्रकार वेगळा व आपल्या स्वत:च्या चुकीमुळे होणारा त्रास वेगळा.कधी कधीनैसर्गिक आपत्ती येते, धरणीकंप होतो, पूर येतो, पूरात घरे वाहून जातात तेव्हा अशा अस्मानी संकंटाना आपण काय करणार.पण दैववाद सांगितला की तो लोकांना लगेच पटतो पण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले तर हे कसे काय म्हणून लोक आम्हाला  विचारतात.

Web Title: Difficult to grieve easier to be happy - Part 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.