Diwali Rangoli 2020: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढा सुंदर, आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 19:09 IST2020-11-13T19:05:44+5:302020-11-13T19:09:46+5:30
Laxmi poojan Diwali Rangoli 2020 : देव्हारा, तुळस, दरवाज्याजवळ, अंगणात तुम्ही सहज या लहान लहान रांगोळ्या काढून सण साजरा करू शकता.

Diwali Rangoli 2020: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढा सुंदर, आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी
लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी घराघरात लगबग सुरू झाली आहे. फराळ, दिवे, नवीन कपडे तसंच रांगोळ्या काढण्यात घरोघरच्या स्त्रिया व्यस्त आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळीला खास महत्व असते. अनेकदा नरक चतुर्दश' आणि 'लक्ष्मीपूजन' एकाच दिवशी येते. यंदाही हाच योग जुळून आला आहे. अश्विन कृष्ण अमावास्येला लक्ष्मी पूजन असते. त्यामुळे यंदा शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या रांगोळीच्या डिजाईन्स सांगणार आहोत. कमीत कमी वेळात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. देव्हारा, तुळस, दरवाज्याजवळ, अंगणात तुम्ही सहज या लहान लहान रांगोळ्या काढून सण साजरा करू शकता.