कर्मफळी आस नसावी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:40 AM2018-12-10T04:40:34+5:302018-12-10T04:42:04+5:30

कर्म करण्याच्या अगोदरच जर त्याचा अभद्र हेतू उराशी बाळगून जर त्याचा पाठलाग करीत राहिले, तरी हेतू शुद्ध नसल्यामुळे पदरी निराशाच येते.

do your work without any expectations | कर्मफळी आस नसावी

कर्मफळी आस नसावी

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले

जाणिवेच्या पातळीवरचा परमार्थ करणाऱ्या साधकासाठी श्रीमद्भगवदगीता हा ग्रंथ जीवन पाथेय आहे. गीतेमध्ये भक्ती व ज्ञानाचे रसाळ वर्णन मिळत असले, तरी त्याचा पाया निष्काम कर्म योगात मिळतो. आध्यात्मिकदृष्ट्या कर्माचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार मिळतात. सकाम कर्म व निष्काम कर्म. ‘सकाम’ या शब्दातच नको त्या आशा अपेक्षांची अभद्र श्वापदे साधकाच्या भोवतीने घुत्कार घालू लागतात. म्हणून साधकाने सकामतेपासून सावध राहावे. सकामतेमध्ये पाप, पुण्य, धर्म, अधर्म प्रायश्चित, क्रियाकर्म यांचा नको तेवढा बागुलबुवा केला जातो. पाप क्षालनासाठी तीर्थाटनाचे उंबरठे झिजविले जातात. बरे! तेथे तीर्थातील शुद्धतेऐवजी नको ते कर्मकांडी खटाटोप केले जातात. तीर्थात स्नान करून शरीरावरील मळ धुऊन काढण्यापेक्षा, सत्कर्माचे पालन करून मनावरील मळ धुऊन टाकतो, तोच खरा परमार्थी अन्यथा परमार्थाच्या नावाखाली स्वार्थाची दुकाने थाटणाºया तथाकथितांना कर्माची महती कधी लक्षात येणार? महाभारतात उद्यम आणि प्रयत्नशीलता यांचे वर्णन केले आहे. भूगर्भात लपलेले पाणी कठोर परिश्रमाशिवाय बाहेर येत नाही. पेरलेले सगळेच उगवत नाही म्हणून पेरायचेच नाही, हे भेकडांचे तत्त्वज्ञान आहे. याउलट शंभर दाणे शेतात पेरले, त्यातले दहाच उगवले, तरी एका-एका जोंधळ्याच्या धाटावरील एका-एका कणसाला शंभर नव्हे, तर हजारो दाणे मोत्यासारखे लागतील. हे शेतकºयांचे होकारात्मक तत्त्वज्ञानच खरा कर्मयोग आहे. आपण आपले काम करावे. धरती आणि पर्जन्य आपले काम करील. हा शेतकºयांच्या मनातील सद्भाव म्हणजेच हेतूवीण आचरणात येणारी सत्क्रिया होय. जिथे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
परी कर्मफळी आस न करावी ।
आणि कुकर्मी संगती न व्हावी।
हे सत्क्रियेचि आचरावी । हेतूवीण ।। ज्ञा.अ.2 ओ266
कर्म करण्याच्या अगोदरच जर त्याचा अभद्र हेतू उराशी बाळगून जर त्याचा पाठलाग करीत राहिले, तरी हेतू शुद्ध नसल्यामुळे पदरी निराशाच येते. यापेक्षा मी माझे कर्म करीत राहीन. जर विश्वात्म्याला ती योग्य वाटली, तर तो योग्य फळ देईलच. कारण कर्म करणे हा माझा अधिकार आहे आणि कर्म फळाची फलनिष्पत्ती दाखविणे ही त्याची सदिच्छा आहे. कुठलीही सत्क्रिया ही हेतू वाचूनच आचरीली जाते. आपण निदान स्वार्थाशिवाय एखादे सत्कर्म, कुठलीही सकामता न ठेवता प्रयत्न करू या!

Web Title: do your work without any expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.