सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 04:02 PM2017-07-22T16:02:36+5:302017-07-25T16:14:26+5:30

दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते.

Easy to sorrow is difficult to sorrow - Part 3 | सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

googlenewsNext

- सदगुरू श्री वामनराव पै
दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडक-यांनी विनोदाने लिहिले ती आज वस्तुस्थिती झालेली आहे.नाटक सिनेमामध्ये दारूला फार प्रतिष्ठा देण्यात येत आहे. टीव्हीवर मी एक नाटक पाहिले त्यांत दारू पिताना तो अभिनेता एका पेगने काय होते आहे असे म्हणतो व त्याला इतर देखील दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे याची जाणिव लोकांना आज नाही.ज्यांना खायला अन्न मिळत नाही,रहायला घर नाही ज्यांना शिक्षण मिळत नाही व ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ती मंडळी जीवनात खरेच दु:खी आहेत असे मी म्हणेन.खरी दु:खी कोण तर ही मंडळी खरी दु:खी आहेत.त्यांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय.हे दारिद्रय का आले हे आपण नंतर  पूढे पाहूया.दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात.अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? तर याला हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकार देखील जबाबदार आहे.ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची.चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे.नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.मी हे सर्व का सांगतो आहे.तर चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होऊ नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे.एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.सांगायचा मुद्दा आपल्या देशात असे होत नाही.आपल्याकडे हे बोलण्याचे धाडस देखील कुणी करीत नाही.कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही.तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण.मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत.ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत.तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन शिक्षण संवर्धन या सर्व गोष्टींची जबाबदारी देखील तुमचीच आहे.हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही मुलांना जन्म द्या व हे करता येत नसेल आणि जर तरिही तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील.मुलांना जर जन्म द्यायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म द्या अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.

Web Title: Easy to sorrow is difficult to sorrow - Part 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.