रत्न खरं आहे की खोटं, कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 03:10 PM2018-04-11T15:10:09+5:302018-04-11T15:10:09+5:30

या रत्नांच्या शुद्धतेबाबत अनेकांना ज्ञान नसतं. त्यामुळे या रत्नांची शुद्धता कशी तपासावी याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Easy steps to judge your ratna purity and identification | रत्न खरं आहे की खोटं, कसे ओळखाल?

रत्न खरं आहे की खोटं, कसे ओळखाल?

Next

ज्योतिषशास्त्रात रत्नांना खूप महत्व आहे. या महागड्या रत्नांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव कंट्रोल करण्याची क्षमता असते, असे मानले जाते. पण या रत्नांच्या शुद्धतेबाबत अनेकांना ज्ञान नसतं. त्यामुळे या रत्नांची शुद्धता कशी तपासावी याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

माणिक किंवा रुबी कसे ओळखावे

खरं माणिक किंवा रुबी रत्न ओळखण्यासाठी तुम्ही कमळाच्या फुलाच्या कळीसोबत एक प्रयोग करु शकता. कमळाच्या बंद कळीवर तुम्ही माणिक ठेवल्यास कळी फुलेल, असे सांगितले जाते.

पुखराजची अशी पटवा ओळख

पुखराजच्या गर्द रंगांवरुन तुम्ही याच्या शुद्धतेची पारख करु शकता. हलका पिवळा आणि कमी चमकदार पुखराजच्या तुलनेत गर्द पिवळ्या रंगाचा पुखराज अधिक प्रभावी मानला जातो. याची शुद्धता तपासण्याची आणखी एक पद्धत म्हणजे या रत्नाला दिवसभर दूधात बूडवून ठेवा. तरीही त्याचा रंग तितकाच गर्द राहिला तर तो खरा पुखराज आहे, असे समजा.

हि-याची पारख

हि-यावर कधीही वाफ जमा होत नाही. त्यामुळे हि-याची शुद्धता तपासण्यासाठी वाफेचा प्रयोग करा. वाफ येत असलेल्या पाण्यावर किंवा दूधावर हिरा पकडा. तुमच्या लक्षात येईल की, हि-यावर वाफ नाहीये. 

पन्ना आणि त्याची ओळख

खरा पन्ना पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवल्यावर ग्लासमध्ये हिरवी किरणे दिसू लागतात.

Web Title: Easy steps to judge your ratna purity and identification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.