मृत्यूजवळचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:28 AM2019-03-07T04:28:47+5:302019-03-07T04:28:52+5:30
मृत्यूनंतर काय होते ते न सांगता येण्याजोगे सुंदर असून आपल्या कल्पना व भावना या सुंदरता सांगण्याच्या जवळपासही येत नाहीत.
- डॉ. मेहरा श्रीखंडे
मृत्यूनंतर काय होते ते न सांगता येण्याजोगे सुंदर असून आपल्या कल्पना व भावना या सुंदरता सांगण्याच्या जवळपासही येत नाहीत. वेळेच्या बंधनात असलेला आपला हा जीव ज्या वेळी अनंत काळासाठी संपुष्टात येतो त्या वेळी मृत्यू त्याचे महत्त्व जराही कमी होऊ देत नाही. मृत्यूच्या जवळ जाऊन परत आलेल्या लोकांचे हे अनुभव आहेत. थोड्याच काळानंतर श्वासोच्छ्वास करू लागल्यावर जी माणसे परत जीवनात आली त्यांना प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. सर्वसाधारणपणे शरीरातून बाहेर पडून तरंगणे, खूप वेगाने बोगद्यातून जाणे व बोगद्याच्या शेवटी तीव्र प्रकाश बघणे, यासारखे अनुभव जवळपास सारखे असतात. प्राणवायूचा मेंदूला झालेला कमी पुरवठा, मज्जातंतूंमधून मृत्यूच्या वेळी सोडलेली गेलेली जादा ऊर्जा आणि गुंगीच्या औषधांचा परिणाम ही कारणे जरी या अनुभवांसाठी देण्यात आली तरी पूर्ण निष्कर्षाप्रत आपण याबाबतीत येऊ शकत नाही. डॉ. रेमंड मुडी, एलिझाबेथ कुबलर रॉस, केनेथ रींग, मायकेल सेबॉम व मेलवीन मॉरीस यासारख्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की, एन. डी. ई. हा प्रकार खूप मोठा आहे़ जरी एन. डी. ई. ची नोंद खूप वर्षांपासूनची आहे़ आताच्या एन.डी.ई.च्या नोंदी या आठव्या शतकांतील क्वटिबेटियन बुक आॅफ द डेड या पुस्तकांतील नोंदींशी मिळत्याजुळत्या आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेल्या दाखल्यांनुसार देवदूत, स्वर्ग व नरक या कल्पनाही एन. डी. ई.शी संबंधित आहेत. जवळपास सर्वच लोक ज्यांना एन.डी.ई.चा अनुभव येतो ती आध्यात्मिक बनतात. त्यांचा स्वार्थ कमी होतो, भौतिकता कमी होते व ती समाजसेवी बनतात.