विज्ञानमय शरीर न संपणारा अत्यानंद प्रतलानुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:53 AM2018-12-07T04:53:25+5:302018-12-07T04:53:33+5:30
विज्ञानमय शरीर न संपणारा अत्यानंद या प्रतलात अनुभवत असले तरी खालील प्रतलात त्याला विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते.
विज्ञानमय शरीर न संपणारा अत्यानंद या प्रतलात अनुभवत असले तरी खालील प्रतलात त्याला विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. कारण ही खालील प्रतले राक्षस व न मानवणाऱ्या गोष्टींनी भरलेली आहेत.
आपल्यासारख्या नाशवंत मानवांना हे विज्ञानमय जग पाहणे अशक्य आहे. भौतिक शरीरामधील केंद्रे ज्यांना आपण चक्र म्हणतो. (व्हीलसाठी संस्कृत शब्द) त्यांच्या मदतीने आपण हे प्रतल बघू शकतो. ही चक्रे ज्याला कमळ असेही म्हणतात ती असे बिंदू आहेत की जिथे भौतिक व विज्ञानमय शरीरे जोडलेली असतात. ही गूढ ऊर्जेची केंद्रे आहेत, असे म्हटले जाते. मेंदूच्या वरील भागात असलेल्या सातव्या व शेवटच्या चक्रातील उत्कट अनुभवांचे वर्णन काही धर्मग्रंथांत समाविष्ट असते. त्या अनुभवांचे वर्णन प्रचंड अत्यानंद, शेवटचे प्रकटीकरण, दैवी मीलन, अमर्याद प्रकाश इत्यादी शब्दांनी केलेले आहे. विज्ञानमय प्रतलात उच्चतम जागी जाऊन आलेल्या ज्या संतांनी व महात्म्यांनी त्या जागेचे सौंदर्याने युक्त व न संपणारा आनंद देणारी जागा असे वर्णन केले आहे ते अनुभवण्याच्या सामर्थ्याला प्रतलीय प्रवास म्हणतात. ते आपल्या सर्वांमध्ये गुप्तपणे असते. नवशिका या प्रवासात उतरतो तो त्याला आलेल्या अनुभवांमुळे पूर्णपणे घाबरून जातो. कारण त्याची प्रतलीय दृष्टी भौतिक दृष्टीपेक्षा जी पूर्णपणे वेगळी असते. हे विज्ञानमय प्रतल, त्यातील जीव व जीवात्म्यांमध्ये असलेल्या शक्ती यांचे सुंदर वर्णन ‘आॅटोबायोग्राफी आॅफ योगी’ या परमहंस योगानंदांच्या पुस्तकात दिले आहे. आकाशीय जीव फक्त इच्छाशक्तीवर विजेपेक्षा जास्त वेगाने एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाऊ शकतात. तत्त्वे ही फक्त इच्छेवर त्यांचे स्वरूप बदलतात. पृथ्वीवरील आत्म्यांव्यतिरिक्त तिथे पºया, प्राणी, बुटकी माणसे व इतर आत्मे असतात. आकाशीय जगात अनेक ठिकाणी हे विज्ञानमय आत्मे आपल्या आप्तस्वकीयांना भेटू शकतात. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरील हे अनुभव सांगणारे विश्वदेखील शास्त्रीय अभ्यासातून अनुभवले गेले पाहिजे.