बाह्य प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:29 AM2019-06-19T03:29:59+5:302019-06-19T03:31:07+5:30

आज सगळीकडे घोषणाबाजीचं अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही.

External effect of Spirituality | बाह्य प्रभाव

बाह्य प्रभाव

Next

- सद्गुरू जग्गी वासुदेव

आध्यात्मिक मार्ग तुम्हाला बाह्य प्रभावांच्या पलीकडे घेऊन जातो. अध्यात्माच्या नावाखाली आज जगात पुष्कळ गोष्टी घडत आहेत ज्यांचा अध्यात्माशी काडीमात्र संबंध नाही. अध्यात्माच्या नावाखाली नैतिकतेची शिकवण दिली जात आहे; घोषणाबाजी अध्यात्म म्हणून शिकवले जात आहे; सांत्वन आणि मानसिक दिलासा एक अध्यात्म म्हणून गणले जात आहे. तर हे समजून घेणे आवश्यक आहे की जो कोणी अध्यात्माच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी सिद्ध आहे तो काही सांत्वन किंवा दिलासा शोधत नाहीये. त्याला ना धन-दौलतीची आशा ना कुठल्या घोषणाबाजी करणाऱ्या गटाचा सदस्य होण्याची इच्छा. ती व्यक्ती स्वत:वर पडलेल्या सर्व प्रभावांपासून मुक्त होऊन आणि त्यांच्या मर्यादांपलीकडे जाऊन; आतून आपले व्यक्तित्व वृद्धिंगत करत असते. आध्यात्मिक प्रक्रियेकडे पाहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे, जेव्हा तुमच्यावर बिंबवलेले एकूणएक प्रभाव तुम्ही झटकून टाकता, बाहेरील परिस्थितीने तुमच्यावर पाडलेले सर्व डाग जेव्हा तुम्ही धुऊन काढता, तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही आध्यात्मिक बनता. पण आज सगळीकडे घोषणाबाजीचं अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही. अनेक जण अध्यात्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अगदी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यातील अनेक उपक्रम अभिनंदनीय आहेत. त्याची स्तुतीच करावी लागेल. मात्र दुर्दैवाने काही ठिकाणी वेगळे अनुभव येतात. जगात बºयाच ठिकाणी अध्यात्माच्या नावाखाली दिशाभूल करण्याचे प्रकार होतात. काही हेतुपुरस्सर केले जातात तर काही अध्यात्माचे धडे देणारे स्वत:च अज्ञान आणि गैरसमजात बुडालेले असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे नेमके काय हे आधी जाणून घ्यावे आणि मगच अध्ययन सुरू करावे.

Web Title: External effect of Spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.