सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 03:06 AM2020-04-28T03:06:23+5:302020-04-28T03:06:27+5:30

’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’

Fed of social debt | सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

googlenewsNext

- प्रल्हाद वामनराव पै
राष्ट्रभक्ती म्हणजे आपलं प्रत्येक पाऊल राष्ट्रहितार्थ असायला हवं. आज लॉकडाऊनच्या काळात आपण सरकारने सांगितलेले सर्व नियम व अटी पाळणे म्हणजे राष्ट्रभक्ती. जीवनविद्या मिशनमधील बालसंस्कार केंद्रातील एक मुलगी एका वेगळ्या शिबिरात गेली होती. तिथे त्यांना एक प्रश्न विचारला गेला, ‘एक कप चहासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे?’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’ कसं काय बरं? तिने सविस्तर उत्तर दिलं, ‘ऊस लावणाऱ्या शेतकºयापासून ती साखर तयार होऊन दुकानातून आपल्या घरी पोहोचण्यापर्यंत अनेकांचा हातभार लागलेला असतो. तसंच चहा पावडर, दूध, गॅस, पाणी, भांडी आदींबाबतीतही! पाहिलंत मुलांनो, आपण फक्त एक कप चहा पिताना किती हातांची मदत घेत असतो! पण याची जाणीव आपल्याला असते का?’ अशा एकमेकांच्या आधारावर, कष्टावर हे जग चाललं आहे. प्रत्येकजण वेगवेगळी कामे करतो म्हणून या जगात एकप्रकारची व्यवस्था आहे. स्वत:ला आपण केंद्रस्थानी ठेवून आपण पाहिलं तर मी, माझ्या गरजा, माझे कुटुंब, समाज, राष्ट्र, पर्यावरण या सर्वांचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होत असतो. आपली व्यवस्था होत असते. सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. शेतकऱ्यांमुळे अन्नाचा घास मिळतोय. कामगारांमुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्यापर्यंत येतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे जगाला फायदा होतो. शिक्षकांमुळे ज्ञान, तर डॉक्टरांमुळे आरोग्य, सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय? सर्व लोक आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना राष्ट्र, समाजासाठी योगदान देत असतात. हे समाजऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आपले काम प्रामाणिकपणे, आवडीने करून! समाज सुखी तर आपण सुखी, हे लक्षात घेऊन सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना म्हणूया, असे शुभचिंतन प्रत्येकाने केले तर तो उत्तमरीतीने समाजऋण फेडू शकतो!

Web Title: Fed of social debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.