व्यसनांपासून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:31 AM2019-12-20T05:31:31+5:302019-12-20T05:31:34+5:30

दारू, धूम्रपान, तंबाखू, गुटखा, जुगार ही व्यसने त्या मानाने खूप सामान्य आहेत. किमान यापासून मुक्तीचे अनेक मार्ग आहेत. परंतु ...

Freedom from addictions | व्यसनांपासून मुक्ती

व्यसनांपासून मुक्ती

Next

दारू, धूम्रपान, तंबाखू, गुटखा, जुगार ही व्यसने त्या मानाने खूप सामान्य आहेत. किमान यापासून मुक्तीचे अनेक मार्ग आहेत. परंतु अशी काही व्यसने असतात ज्यापासून मुक्तीचे मार्ग अनेकांना सापडत नाहीत आणि ते व्यसन आहे हे मान्य करायलाही अनेक जण तयार नसतात. या छुप्या व्यसनांमुळे त्यांची आत्मिक प्रगती पूर्णपणे थांबते. ही व्यसने पुढीलप्रमाणे : सतत चुगल्या करणे, सतत कुणाला ना कुणाला कमी लेखणे, विचार न करता चुकीचे बोलणे, शुभकार्यात अडथळे आणणे, दुसऱ्याच्या कामात मुद्दाम चुका काढणे, निर्व्यसनी माणसाला व्यसन लावणे, इतरांचा मत्सर करणे, सतत लाभाचाच विचार करणे, जातीपातीचे अवडंबर माजवणे, इतरांविषयी वाईट बोलत राहणे, कुणाच्याही भावनेची सतत उपेक्षा करणे, अपमानास्पद वागणूक देणे, गटबाजी निर्माण करून आपला स्वार्थ साधणे, फायद्यासाठी मैत्री करणे आणि फायद्यानंतर मैत्रीला तिलांजली देणे, विश्वासघात करणे, अंधश्रद्धा व गैरसमज निर्माण करणे, सत्य लपवून ठेवणे, सतत इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणे, इतरांच्या कलेची चोरी करून आपल्या नावावर करून घेणे, विचार न करता कशावरही भाळणे, स्वत:ला कारण नसताना दोषी ठरवणे, मनातल्या मनात कुढत बसणे, तरुणांना वाईट संगत लावणे, सतत वासनाग्रस्त राहणे, इतरांच्या प्रगतीचा, यशाचा मत्सर करणे, अशा प्रकारच्या वृत्तीचे व्यसन असलेली माणसे ना स्वत: आनंदी राहत, ना इतरांना आनंदी राहू देत. या व्यसनमुक्तीला एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वत:ला तपासून पाहून आपण असे का वागतो, हा प्रश्न सतत स्वत:ला विचारत राहणे. शारीरिक आजाराला औषध असते, पण मानसिक आजार बरा करण्यासाठी माणूस स्वत:च स्वत:ला सहकार्य करू शकतो. मनाची न बरी होणारी व्यसने कॅन्सरपेक्षाही घातक असू शकतात. व्यसन अंगाशी आल्यावरच हे लक्षात येत राहते. त्यामुळे अशा व्यसनापासून मुक्त होण्यातच खरा आनंद असतो.

-विजयराज बोधनकर

Web Title: Freedom from addictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.