मनाशी मैत्री...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 08:19 PM2019-08-06T20:19:12+5:302019-08-06T22:05:05+5:30

एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही सांगितले तरी तो म्हणेल ठीक आहे.

Friendship of mind | मनाशी मैत्री...

मनाशी मैत्री...

googlenewsNext

- वैदेही जंजाळे

नको रे मना, क्रोध हा खेदकारी 
नको रे मना, काम नाना विकारी
नको रे मना, सर्वदा अंगिकार
नको रे मना, मत्सरु दंभभारू

मन:शांती जीवन जगताना अत्यंत गरजेची असलेली मनाची अवस्था चांगली असावी लागते. खरेतर जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा उत्तर काहीही असले तरी मन थाऱ्यावर येत नाही. या उलट जर मन शांती आणि ध्यान जागेवर असेल त्यावेळी एक पुसटशी खूण मिळाली तरी तुम्हाला तुमचे उत्तर प्राप्त होते. 

जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही स्वत: सोबत, स्वत:च्या विचारांसोबत असता, त्यावेळी तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच मिळते. प्रश्न व अडचण कितीही मोठी असो, काही काळ निवांत स्वत: सोबत वेळ घालविणे गरजेचे आहे.

एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही सांगितले तरी तो म्हणेल ठीक आहे. पण त्याची मनाची अस्वस्था व त्यात येणारे असंख्य विचार त्याला विचलीत करत असतात. हे अशा मनाचे लक्षण आहे ज्यात इतक्या कल्पना भरलेल्या असतात की नवीन ज्ञान किंवा माहिती आत शिरायलाही जागा नसते. मन:शांतीसाठी काही गोष्टी आजच्या धकाधकीच्या, तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक आहेत.

मनाला स्थिर होण्यासाठी तयार करा - 
आपल्या मनात येणाऱ्या अनियंत्रित विचारांनी अनावर मनामुळे आपली प्राण उर्जा निघून जाते आणि आपण निराश व विफल होतो. मग अशा सैरभैर झालेल्या मनाला स्थिर, शांत करणे गरजेचे असते. आपण प्रत्यक्षपणे मन:शांती मागू किंवा प्राप्त करू शकत नाही. मात्र, मनाला शांत, स्थिर होण्यासाठी तयार नक्की करू शकतो. ध्यान धारणा ही त्यामुळेच अत्यंत गरजेची झालीय.

प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या -
जेव्हा अनावर कठीण प्रसंग येतात तेव्हा तुमच्या मनाचे निरीक्षण केलंय का कधी? अशा वेळी मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो आणि मन बेचैन होऊन आपण प्रतिक्रीया व्यक्त करण्यास सुरुवात करतो. अशा बहुतांश वेळी मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो. आपण भावनावश होतो. सतत विचार करतो की असे का घडले? आपल्या सोबतच का घडले? मी काय केले? अशा वेळी मी काय करायला पाहिजे? हा विचार करणे परिस्थितीला दर्जात्मक व आशावादी प्रतिसाद देणे गरजेचे असते.

शांत रहा, निर्णय चुकणार नाहीत - 
भोवतालच्या परिस्थितीवर आपण मात करू शकत असल्याची आपली क्षमता खूप प्रभावशाली असते. आपले मन आणि देवाने दिलेली बुद्धी ''ब्रेन" हे एक अत्यंत म्हणजे अति संवेदनशील व पावरफूल देणगी आहे. त्यावर जर प्रभुत्व मिळविले तर कठिणातला कठीण प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होते. त्यासाठी ध्यानधारणा, योगसाधना अत्यंत महत्वाचे अंग आहेत.

१. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवतो. ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला स्थिर ठेवू शकतो.
२. भावनिक स्थैर्य प्राप्त होते.
३. प्रतिक्रिया व्यक्त न करता, प्रतिसाद देण्याची क्षमता प्राप्त होते. 
४. आपण स्वत:सोबत भेटण्यास वेळ काढतो.
५. स्वत:ची वैचारिक पातळी वाढवतो व निर्णय घेण्यास सक्षम होतो.
६. ध्यान लावल्याने तुमचे ध्यान कुठे भटकत नाही.

अत्यंत निराक्ष वाटते तेंव्हा काय करावे?
१. स्वत:ची जागा बदला. ( उदा. ज्या जागेवर असाल तेथून उठा व जागा बदला) Change Your Physiology
२. आवडीचे संगीत लावा.
३. ज्या संगीतात मन रमते अथवा. Mood Changing Music
४. अशा वेळेस उपास अथवा Low Sound Track ऐकू नये.
५. ज्या गोष्टीमुळे नैराश्य आलय त्या लिहून काढा.
६. प्रत्येक गोष्टीसाठी ३ मार्ग शोधून काढा.
७. स्वत:ची भाषा बदला Change Your Linguistic

उदा. माझे काम होईल का? माझे काम झालेल आहे, असे बोला व तेच visualize करा. लक्षात ठेवा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही नक्कीच जो हवा तसा बदल घडवून स्वत:चे आयुष्य बदलवू शकता.
 

Web Title: Friendship of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.