साधनेचे फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:53 AM2018-11-29T06:53:20+5:302018-11-29T06:53:28+5:30

बहुतांश लोक भोगलालसेने पछाडलेले असतात.

The fruit of the medicine | साधनेचे फळ

साधनेचे फळ

Next

मत्त: परतरं नान्यत्किश्चिदस्ति धनश्चय.
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव।।गीता:।।

‘पार्था, तू हे प्रथम लक्षात घे की, माझ्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाशिवाय, या विश्वात दुसरे सत्य नाही. मीच या दृश्य विश्वाला कारणमात्र आहे. हे प्रगाढ विश्व माझ्याचमुळे निर्माण झाले आहे आणि शेवटी ते प्रगट विश्व मजमध्येच विलीन होणार आहे. या विश्वात मी ओतपे्रत भरून आहे. एका परमेश्वराची सत्ता या विश्वात कार्यरत आहे. भगवंतच या विश्वाचे मूळ कारण आहे. सूतामध्ये मण्यांऐवजी सूताचेच मणी ओवले, तर तो धागा आणि ते सूताचे मणी एक सूतच असते ना! त्याप्रमाणे, या संपूर्ण दृश्य विश्वात सर्वत्र मीच व्यापून आहे. माझ्या अस्तित्वाशिवाय या विश्वात दुसरे काहीच नाही, हे तू ध्यानात घे, पार्था...
बहुतांश लोक भोगलालसेने पछाडलेले असतात. त्यांच्याभोवती वासनेचा अजगरी विळखा पडलेला असतो. ‘परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी,’ हा विचार त्या वासनाग्रस्त दुर्दैवी जिवांच्या स्वप्नातसुद्धा डोकावत नाही वा तशी इच्छासुद्धा त्यांच्या विषयांध मनात उमलतच नाही. या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सत्यदर्शन घडविताना म्हटले की,
मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिध्दानां कश्चिनन्मां वेत्ति तत्वत:।।

पार्था, माझे असंख्य भक्त या मानवी विश्वात वावरत असतात. त्यांच्यातली चंचल देहबुद्धी मनात वासना प्रदीप्त करून त्या असंख्य भक्तांना, वासनापूर्तीच्या लालसेने त्यांना माझ्या भक्तीच्या दिशेने वळविते, असे कामनाग्रस्त भक्त जे असतात, त्यांच्या भक्तीचा आदर करीत, मी त्यांच्या निश्चितपणे पूर्णसुद्धा करतो, परंतु पार्था, तू एक लक्षात ठेव की, या असंख्य भक्तांमधला एखादा याचनाविरहित आयुष्य जगणारा माझा एखादा परमभक्त असतो की, जो फक्त अत्यंत कष्टसाध्य उपासना केवळ माझीच प्राप्ती व्हावी म्हणून करतो. असे जे थोडे परमभक्त या मानवी विश्वात आहेत, त्यातला एखादाच माझा परमभक्त मला यथार्थपणे जाणतो की, मी संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. चराचरात मीच दाटून आहे. पार्था, तू लक्षात ठेव की, फारच थोडे सिद्ध पुरुषोत्तम माझ्या अस्तित्वाचा वेध घेत मला येऊन मिळतात. ते भक्त दुर्लभच असतात. भगवंतांची प्राप्ती होणे, हे आपण करीत असलेल्या निस्सिम साधनेचे अतिशय रसाळ असे शाश्वत फळ आहे.

-वामन देशपांडे

Web Title: The fruit of the medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.