Ganesh chaturthi 2020: बाप्पाला प्रिय असणाऱ्या 'या' ५ गोष्टींचा रोज पूजेत न चुकता करा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:42 PM2020-08-21T13:42:36+5:302020-08-21T13:55:04+5:30
गणेशोत्सवाच्या काळात आपण बाप्पाच्या आवडीचे अनेक पदार्थ आणि पूजाविधी करत असतो. अशात काही राहून जायला नको म्हणून बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टींबाबत जाणून घ्यायलाच हवं.
गणपती बाप्पाचं आगमन उद्या सर्वत्र होणार आहे. लॉकडाऊन आणि माहामारीचं सावट असलं तरी बाप्पाचं आगमन होणार म्हणून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी गणरायाला वंदन केलं जातं. सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गणरायाच्या पूजेसाठी काही गोष्टींचं विशेष महत्त्व असतं.
आज आम्ही तुम्हाला अशा ५ वस्तूंबाबत सांगणार आहोत ज्यांचा गणेश पूजनामध्ये समावेश करणं अत्यंत महत्वाचं समजलं जातं. गणेशोत्सवाच्या काळात आपण बाप्पाच्या आवडीचे अनेक पदार्थ आणि पूजाविधी करत असतो. अशात काही राहून जायला नको म्हणून बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टींबाबत जाणून घ्यायलाच हवं.
मोदक
गणरायाला लंबोदर असंही म्हटलं जातं. गणरायाच्या नैवेद्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर असतं. गणपतीला मोदक फार आवडतात. त्यामुळे नैवेद्य म्हणून मोदक असणं अत्यंत आवश्यक असतं. उकडीचे, चॉकलेटचे, बुंदीचे, काजुचे, रव्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य तुम्ही बाप्पाला दाखवू शकता.
दुर्वा
विघ्नहर्त्याला दुर्वा फुलांपेक्षाही जास्त आवडतात. त्यामुळे पूजे दरम्यान दुर्वा तोडून देवाला अर्पण कराव्यात. फुलांमध्ये गजाननाला सर्वाधिक झेंडुची फुलं आवडतात. त्यामुळे बाप्पाला झेडूंची फुलं वाहण्यास विसरू नका. शक्य असल्यास तुम्ही झेंडुच्या फुलांची आरासही करू शकता.
केळी
बाप्पाला फळांमध्ये सर्वाधिक केळी आवडतात. त्यामुळे बाप्पाला केळ्यांचा नैवेद्य दाखवा. पण लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार, केळ्याचं एक फळं पूर्ण मानलं नाही जात. त्यामुळे नेहमी दोन केळी देवाला अर्पण करावीत.
शंख
गणपतीच्या चार हातांपैकी एका हातामध्ये त्यांनी शंख धारण केला आहे. त्यामुळे शास्त्रात सांगितल्यानुसार, गणरायाच्या पूजेमध्ये शंख फुंकणं आवश्यक ठरतं. गणारायाच्या आरतीच्या वेळी शंख फुंकण्यास विसरू नका.
हे पण वाचा-
Ganesh Chaturthi 2020 : गणेशोत्सवात 'या' टिप्स वापरून झटपट मिळवा मराठमोळा पारंपारिक लूक
Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'या' 5 प्रकारचे मोदक झटपट करा तयार!