कोमल वाणी दे रे रामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:49 AM2018-08-03T02:49:18+5:302018-08-03T02:51:20+5:30

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले.

 Gentle voice de rayma! | कोमल वाणी दे रे रामा !

कोमल वाणी दे रे रामा !

Next

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. चौकीदार बोलणे सहन करू शकला नाही व त्याने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या गृहस्थाला अटक झाली व पुढे तुरुंगात रवानगी झाली. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात.
कोमल वाणी दे रे रामा ।
विमल करणी दे रे रामा ।।
संत तुकाराम महाराज म्हणतात,
बोलावे बरे । बोलावे खरे ।
कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।
म्हणजेच बोलताना शब्दाबाबत आपण अत्यंत जागरूक असणे आवश्यक असते. बरेचदा जीवनात घटना खूप क्षुल्लक असतात, पण आपण त्याला धारधार शब्दांनी चिघळून टाकतो. शब्दाला धार नसावी तर शब्द हे आधार देणारे असावेत कारण धारधार शब्द मन कापतात तर आधार देणारे शब्द मन जोडतात. जेव्हा आपण धारधार शब्द वारंवार बोलण्यात वापरतो तेव्हा ते आपल्या संस्काराचा भाग बनतात मग थोडंसुद्धा मनाविरुद्ध झालं की आपोआप धारधार शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे आपली इच्छा जरी चांगले शब्द वापरण्याची असेल तरी ते वापरणे आपल्या नियंत्रणात राहत नाही मग आपण म्हणतो की मला चांगलंच बोलायचं होत. पण माझ्या मुखातून वाईटच शब्द बाहेर पडतात. आपण या सवयीचे एवढे आहारी जातो की घरी व दारी असेच शब्द वापरायला लागतो. त्यामुळे आपले व परके असे सर्वच संबंध धारधार शब्दांमुळे संपुष्टात येतात. बरेचदा शब्द हे कृतीपेक्षाही जास्त घायाळ करतात. जेव्हा आपण दुसऱ्याला आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी दु:खी करतो तेव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण होते व ती आपल्याला स्वत:ला घातक ठरते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥
म्हणजेच सारासार विचार केल्याशिवाय बोलू नये. कार्य सुरू करताना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरू करू नये. नीती अनीतीचा विचार केल्याशिवाय हालचाल करू नये.

Web Title:  Gentle voice de rayma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.