दुसऱ्याला आनंद देणे म्हणजेच परमार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 07:26 PM2020-03-21T19:26:12+5:302020-03-21T19:26:42+5:30
दुसऱ्यला आनंद देणे म्हणजेच परमार्थ होय.
दुसला आनंद देणे म्हणजेच परमार्थ! दुसºयाच्या आनंदाचा विचार करणे म्हणजेच परमार्थ. यातून खरं तर आपण स्वत:लाच मदत करत असतो. त्यासाठी मनात स्वच्छ दातृत्वभाव हवा. मात्र आपला परमाथार्चा स्वार्थ साधण्याच्या नादात आपण याचकवृत्तीला खतपाणी तर घालत नाही ना, याचा विचार करायला हवा. दान हे नेहमीच सत्पात्री असायला हवे. स्वहिताचा म्हणजेच स्वाथार्चा विचार म्हणजे पाप आणि परमाथार्चा विचार म्हणजेच पुण्य हे आपल्यावर बिंबवले गेले आहे. त्यागाच्या चमत्कारिक कल्पनांनी भारावून, श्रीमंत होणे हे पाप मानले जाऊ लागले आहे. भारतीय धर्मतत्त्वात, परमार्थात कुठेही मानवी जगण्याचा उपहास केलेला नाही. निराशा, पळपुटेपणा आणि दुर्बलतेला दुरूनही कुठे थारा दिलेला नाही. वेद-उपनिषदांचे सारे तत्त्वज्ञान आजन्म तारुण्याचा अनुभव घेण्याची प्रेरणा देणारे तत्त्वज्ञान आहे. मरणोत्तर मिळण्या, न मिळणा-या सुखांच्या मृगजळात वर्तमानातले मुसमुसणारे क्षण जाळण्याचे वैचारिक दारिद्र्य या तत्त्वज्ञानाच्या अंतरंगात औषधालाही सापडणार नाही. पण अन्वयार्थाच्या आवर्तात आत्माच हरवून बसला आहे. तरुणांना म्हणूनच परमार्थ प्रांत आपला वाटत नाही. आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्याला धावत जाऊन मिठी मारण्याचा आणि त्या आयुष्याच्या आकंठ आस्वादातून, अंतर्बाह्य देखणे होण्याचा महामार्ग आहे परमार्थ! ती प्रखर प्रेरणा आहे अध्यात्म! धर्म-परमार्थ शास्त्राचा कालानुकूल अर्थ लावायला विसरलो. तशी सरळ मोकळीक देणारा जगातील एकमेव तत्त्वमार्ग आपला असूनही ते कर्तव्य आपण बजावले नाही. लौकिकाची ओढ, धनसंपन्नतेचे आकर्षण, देहाचे सौंदर्य, संसाराचे सुख याची अवहेलना म्हणजेच परमार्थ, असा भाव प्रत्येकाला तेथे जाणवतो. वषार्नुवर्षे परमार्थ सांगणारे आणि ऐकणारे, ज्याची निंदा करण्यात रस घेतात, त्या रसातच ते लडबडलेले दिसतात. पारमार्थिक माणूस फुलला, बहरला आहे असा अनुभव येत नाही. उलट त्यांच्या चेह-यावर जगण्याचे ओझे स्पष्ट दिसते. त्यांचे त्यांना लखलाभ असो, पण ऊजेर्चा मोठा वर्ग, तरुण वर्ग या महत्त्वाच्या संस्कार क्षेत्रापासून वंचित राहाणे जगाच्या दृष्टीने घातक आहे. -शून्यानंद संस्कारभारती