आनंद तरंग - निसर्गाच्या सान्निध्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 06:25 AM2019-04-04T06:25:56+5:302019-04-04T06:26:16+5:30
खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत उभे राहून हिरवेगार वृक्ष पाहावे, पक्षांची किलबिल ऐकावी
ब्रह्माकुमारी नीता
खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत उभे राहून हिरवेगार वृक्ष पाहावे, पक्षांची किलबिल ऐकावी, निसर्गाचे छोटेसे सुंंदर रूप पाहूनही मनाला सुखद अनुभव मिळू शकतो. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा खास वेळ काढून जवळपासच्या बागेत किंवा समुद्राच्या किनारी बसून मनाला ताणतणावाच्या विचारांपासून रिक्त करावे. प्रकृतीची पाचही रूपे (जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी) आपल्याला खूप काही देत आहेत. त्यांंची साथ आपल्याला नि:स्वार्थ प्रेम करायला शिकवते, उदार होऊन दुसऱ्यासाठी खूप काही करण्याची शक्ती देते, विशाल हृदयामध्ये सगळे हेवेदावे सामावून घेण्याची कला शिकविते, मनाला पवित्र करण्याची विधी शिकविते, कोणी कसेही असो परंतु मायेचा विसावा द्यायला शिकविते. निसर्गाने बनविलेल्या नियमानुसार चालणारी व्यक्तीच आपले तन-मन स्वस्थ ठेवू शकते. ज्यांनी शरीराची १०० वर्षे ओलांंडली अशा काही लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लवकर उठणे, लवकर झोपणे त्याचबरोबर समतोल आहार आणि विचारांंची सकारात्मकता यावर विशेष लक्ष ठेवले. पहाटेचा सूर्य, त्याची सोनेरी किरणे, ढगांवर चढलेली त्या किरणांंची लालिमा, पक्षांचे उडते थवे, कोंबड्यांची आरव, जसे जीवनालाच नव्याने सुरुवात करायला सांगते. रोज निसर्ग उदार होऊन आपले मातृप्रेम आपल्यावर ओतत असतो. गुणांची उधळण करीत राहतो. प्रकृतीचे एक-एक रूप अनेकानेक गुणांनी भरले आहे. ‘धरती माता’ हा शब्द आपण ऐकतो. खरंच या वसुंधरेने आपल्या भल्यामोठ्या पदरात सर्वांना सामावून घेतले आहे. पशू, पक्षी, मनुष्य सर्वांचे पालन-पोषण करीत राहते. आज या धरेवर गगनचुंबी इमारती बनविल्या जात आहेत.