प्रपंचातील आसक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:28 AM2018-12-15T05:28:29+5:302018-12-15T05:31:10+5:30

भगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात.

god gives his Blessings to devotees who dedicatedly prays | प्रपंचातील आसक्ती

प्रपंचातील आसक्ती

Next

- वामन देशपांडे

भगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात. अशा परमभक्तांपाशी समत्व बुद्धी नांदत असते, तीच भगवदकृपा असते. अशा श्रेष्ठ परमभक्तांच्या मनात मर्त्य विषयाचा कोलाहल चुकूनही उत्पन्न होत नाही. कारण एकच. भगवंतांचे नाम मर्त्य विचारांना कधीच थारा देत नाही. अशाच श्रेष्ठ परमभक्तांना जणू एक सिद्धी प्राप्त झालेली असते आणि ती म्हणजे त्यांना शास्त्रवचनांच्या गडद छायेत वावरता, वा मनन-चिंतनाच्या अक्षय फेऱ्यात न अडकता, भगवंत स्वत: त्यांना तत्त्वज्ञानाचे अक्षय भरलेले कुंभ प्रेमाने देतो. असे परमभक्त जे जे काही प्रगट करतात, तो इतरांसाठी तत्त्वबोध होतो. जणू भगवंतच त्या आपल्या लाडक्या परमभक्तांच्या मुखातून सर्वसामान्य माणसांना तत्त्व समजावून सांगत असतो. भागवतात श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश केला होता की,
प्रायेण भक्तियोगेन सत्सडेग विनोद्धव।
नोपायो विद्यते सध्येङ्प्रायणं हि सतामहम।। भागवत ११:११:४८।।
उद्धवा, सत्संग आणि हृदयस्थ शुद्ध प्रवाही परमभक्ती हीच माझ्या प्राप्तीची सर्वोत्तम साधना आहे. योग, सांख्य, जप-जाप्य, व्रतवैकल्य, तीर्थाटणे मला विशेष प्रसन्न करीत नाहीत. केवळ ऋषीमुनींच्या सत्संगात माझी प्राप्ती निश्चितणे होते, हे तू लक्षात घे.भगवंतांनी आपले भक्तीरहस्य उलगडून सांगताना आपल्या अत्यंत लाडक्या शिष्याला अतिशय हळुवार शब्दात समजावले होते की,
समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रिय :।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम।।
पार्था, आपल्या डोईवरील निळेभोर पसरलेले आकाश सर्वत्र सारखेच असते ना, तसा मी परमेश्वर सर्वत्र सारखाच आहे. चराचरात मी अखंडपणे व्यापून आहे. संपूर्ण जीवसृृष्टीमध्ये मी समानच आहे. आकाश जसे मानवी सुखदु:खांपासून पूर्णपणे अलिप्त असते, त्याप्रमाणे मीसुद्धा मानवी सुखदु:खांपासून अलिप्त आहे. मी कुठल्याही जीवाचा द्वेष करीत नाही की कुठल्याही जीवात प्रेमभावनेनं गुंतत नाही. परंतु जो माझा परमभक्त माझ्याच भजन-कीर्तनात सदैव दंग असतो, ते परमभक्त माझ्या प्रेमाचा विषय होतात. मी परमेश्वर त्याच माझ्या परमभक्ताच्या हृदयगाभाºयात स्थिर होतो. ते माझे होऊन जातात आणि मी त्यांचा होतो. हे माझे भक्तीरहस्य तू ध्यानात ठेव. त्याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, ते माझे परमभक्त, करीत असलेल्या प्रपंचात आसक्त नसतात. त्यांचा शरीरभाव यत्किंचितही सळसळत नसतो. ते माझे परभक्त सदैव माझ्या अस्तित्वात विरघळून जाण्याचा प्रयत्न करीत फक्त माझी प्रसन्नता मिळवतात. पार्था ते खरे आत्म्याच्या साक्षीने जगत असतात...
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच परमभक्तांना अत्यंत पे्रमाने भक्तीसंदेश देतात की,
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण।।
भक्तश्रेष्ठ अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत लाडका भक्त होता म्हणून भगवंतांनी आपल्या अंत:करणातले गुह्यतम ज्ञान अर्जुनापाशी प्रगट केले. महत्वाचे कारण हे होते की, अर्जुन हा ‘अनसूयवे’ म्हणजे दोषदृष्टिरहित होता. भगवंतांनी स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा महिमा, फक्त अर्जुनालाच वर्णन करून सांगितला होता.

Web Title: god gives his Blessings to devotees who dedicatedly prays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.