...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:04 AM2020-01-08T05:04:19+5:302020-01-08T05:04:29+5:30

भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती.

Good versus good | ...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

Next

- सद्गुरू जग्गी वासुदेव
भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती. म्हणजे आध्यात्मिक पाऊल हे नेहमी पहिले पाऊल असे, त्यानंतरच मग व्यक्तीचे इतर प्रकारच्या शिक्षणाने सशक्तीकरण होत असे. जीवनात अध्यात्म हे पहिले पाऊल आहे, हे जो जाणत नाही अशा व्यक्तीला थोडे जरी सशक्त केले तरी तो धोकादायक ठरतो.
आजकाल जगात हेच घडतेय. आज शिक्षणामुळे म्हणा किंवा राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यामुळे; ममताशून्य आणि आनंदहीन लोकांच्या हाती पुष्कळ अधिकारिक सत्ता आली आहे. आज वाईट लोक नव्हे, तर चांगले, सुशिक्षित लोक जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. जगात माजलेला संघर्ष हा वाईट विरुद्ध चांगले असा नाहीये. तो नेहमी दोन चांगल्या व्यक्तींमध्ये आहे. जगात ज्याला दहशतवादी म्हणतात, त्याला वाटते की तो खूप चांगला माणूस आहे. जेवढे अधिक आपण चांगले आहोत असे त्याला वाटते तेवढा तो आपल्यासाठी विनाशकारी ठरतो. वाईट माणसे लढायच्या भानगडीत पडत नाहीत. फक्त चांगली माणसेच संपूर्ण संस्कृती नामशेष करतील आणि एकमेकांचा समूळ नायनाट करतील यात शंका नाही. म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. तर प्रत्येक व्यक्तीची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्याने आपले आंतरिक स्थैर्य प्रस्थापित करणे व एक आनंदी व्यक्ती बनणे. ज्या माणसाला स्वत:चे शरीर, मन आणि भावना नीट हाताळता येत नाहीत; पण त्याला जग हाताळायचे आहे, हे कदापि शक्य नाही. जर तुम्हाला स्वत:ला कसे सांभाळायचे हे माहीत नसेल, तर जग कसे सांभाळावे हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून स्वत:मध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे, आपला आंतरिक समन्वय आणि सुसूत्रता साधणे आणि आतून एक आनंदी व्यक्ती होऊन बहरणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी आहे. माणूस एकदा जर आनंदी झाला की साहजिकच तो जगात केवळ आनंदच उधळणार.

Web Title: Good versus good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.