चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:26 PM2019-06-05T14:26:27+5:302019-06-05T14:28:55+5:30

रमजान ईद विशेष

Goodminder holy Ramadan month | चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना

चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना

googlenewsNext
ठळक मुद्देखरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते.कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो

खरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान. रमजान हा प्रशिक्षणाचा महिना आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते. रमजान महिना आपणाला अहिंसा हे मूल्य अंगी बाणवण्याचीही प्रेरणा देतो. कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो.

प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘जो तुझ्यावर अन्याय करेल, त्याला माफ कर. जो तुझ्याशी असलेले नाते तोडेल, त्याच्याशी तू नाते जोड, जो तुला वंचित ठेवेल, त्याला तू भरभरून दे’’ पैगंबरांची ही शिकवण अतिशय महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. अगदी शेजाºयाशीही कसे वागावे, याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे. ज्याची श्रद्धा दृढ आहे तो नेहमीच शेजाºयाबरोबर चांगले वागतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जो  स्वत:साठी एखादी गोष्ट पसंद करतो, तीच गोष्ट तो इतरांसाठीही पसंद करतो. म्हणजेच इस्लाममध्ये माणसांमधील भेदभावाला स्थान नाही.

प्रेषितांनी मानवाला देशाबद्दलचे कर्तव्यही सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, माणूस ज्या भूमीत राहतो त्या भूमीशी त्याने प्रामाणिक असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुसलमान स्वत:च्या देशासाठी आपले प्राण, धनदौलतीची आहुती देण्यासाठी सदैव तत्पर असतो; पण काही समाजकंटक मात्र आपल्या स्वार्थासाठी समाजात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. देशाला जर प्रगतिपथावर न्यायचे असेल तर एकमेकांशी विश्वास, बंधुभाव, प्रेम आणि मैत्रभावाने मिळून मिसळून राहिले पाहिजे. या देशाची गंगा - यमुना संस्कृत सदैव जिवंत ठेवली पाहिजे. ही आपल्या देशाची खरी मूलभूतता आहे.

इस्लाममध्ये जी प्रार्थना केली जातो तिचे धार्मिक आणि सामाजिक असे दोन स्वरूप आहेत. हीच या धर्माची विशेषता आहे. रोजा, जकात आणि दानधर्म करणे हे सारे धार्मिक आणि पुण्याचे आहे. यामुळेच सामाजिक जागरुकता निर्माण होते. रोजामध्ये माणूस खाणे - पिणे, स्त्रीसंबंध याबद्दल संयम बाळगला जातो. वस्तुत: हा संयम म्हणजे रोजा आहे. याशिवाय रोजेदारावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. प्रेषित पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘तुम्ही चुकीचे काम कधीच करू नका, खोटे बोलू नका, चहाडी करू नका. हे नियम तुमच्यासाठी नित्याचेच आहेत; पण जर रोजेदार असाल तर यासंदर्भात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.’’ पैंगबर म्हणतात, तुम्ही कुणाशीही भांडण करायचं नाही, इतके की, कुणी तुमच्याशी भांडायला आलं तरी त्याला सांगायचं की, मला भांडण करायचं नाही, कारण मी रोजेदार आहे. (बुखारी/ मुस्लीम).

रमजान महिना आपणाला अहिंसेची प्रेरणा देतोच. शिवाय गोरगरीब, गरजवंतांना आर्थिक मदत करण्याचाही आदेश करतो. आपल्याकडे काम करणाºया नोकरावरही रमजानच्या महिन्यात कामाचा बोजा टाकू नका, हा संदेशही देण्यात आला आहे. या महिन्यात दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. स्वत: पैगंबर नेहमीच गरिबांवर खूप खर्च करीत; पण रमजानच्या पवित्र महिन्यात ते गरिबांसाठी अधिक खर्च करायचे. प्रेषितांचे अनुयायी सांगत की, एखादा मेघ ज्याप्रमाणे ओसाड जमिनीवर पावसाची बरसात करतो, अगदी त्याप्रमाणे प्रेषित मोहम्मद गरिबांवर मदतीचा वर्षाव करत असतो... रमजानच्या पवित्र महिन्याचे हे असे महत्त्व आहे.
- शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी

Web Title: Goodminder holy Ramadan month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.