सांग रे उद्धवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:36 AM2019-11-21T03:36:52+5:302019-11-21T03:38:46+5:30

कृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला. श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता. त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दु:खी झालेल्या मातापित्यांना कुशल सांग. गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर, असे सांगितले.

gopi asks about krishnas wellness to his friend uddhav | सांग रे उद्धवा...

सांग रे उद्धवा...

Next

- सौ. शैलजा भा. शेवडे

कृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला. श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता. त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दु:खी झालेल्या मातापित्यांना कुशल सांग. गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर, असे सांगितले. उद्धवाने तसे केले, तेव्हा गोपी उद्धवाला म्हणाल्या -
‘सांग रे उद्धवा, स्मरतो का कृष्ण कधी,
वृन्दावनां आणि अम्हां, ग्राम्यगोपिकांना,
मथुरेत जाऊनिया, वाटतो जणू विसरला,
येईल का फिरून कृष्ण, सांग रे आम्हांला’
शरद रात्र, पूर्णचंद्र, कुमुद गंध दरवळला,
कृष्णगान, ते मुखात, नुपुरनाद रुणझुणला,
वृंदावन, रासक्रीडा, स्मरते का कधी त्याला,
येईल का, फिरून कृष्ण, सांग रे आम्हाला
ग्रीष्मातील शुष्क वन, म्लान आम्ही कृष्णाविन
कृपाकटाक्ष संजीवन, सळसळेल, देही प्राण,
गोविंद, हा मंत्रच तो, देहांत या किती घुमला,
येईल का, फिरून कृष्ण, सांग रे आम्हाला
घेऊन येई गार्इंना, चरावया या इथे,
खेळत, गोपांसह, भूमीवर या इथे,
वेणुनाद घुमतसे, तीरावर या इथे,
श्रीनिकेतन पावले, उमटली या इथे,
व्याकुळ अम्ही, स्मरतो रे, पुन्हा-पुन्हा कान्ह्याला,
येईल का फिरून कृष्ण, सांग रे आम्हाला
सांग कसे विसरू आम्ही, सुंदर ते चालणे,
मनमोहक हास्य आणि मधुर ती भाषणे,
हरवलो अच्युतात जणू, अशा स्वत:ला,
येईल का फिरून कृष्ण, सांग रे आम्हाला
‘कृष्ण कृष्ण’ करत गोपी बेभान पुन्हा जाहल्या,
कृष्ण इथे, कृष्ण तिथे, प्रार्थना करू लागल्या,
‘हे नाथ, रमानाथ, व्रजनाथ, दु:खनाशका,
दु:खसागरी, गोकुळ बुडे, वाचव रे आम्हाला’

Web Title: gopi asks about krishnas wellness to his friend uddhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.