विराट पुरुष रामा..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:24 AM2020-04-20T05:24:15+5:302020-04-20T05:25:46+5:30
श्रीरामाला तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, याची जाणीव केली. त्याआधीही परशुरामाने रामाचे अवतारित्व घोषित केले होतेच! रावणवधासाठी मनुष्यदेह धारण केला होता.
वाल्मीकी रामायणात लिहिले आहे, सीतेने जेव्हा अग्निप्रवेश केला, तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव, देवेंद्र, यम वगैरे सगळे देव विमानातून एकत्रच लंकेत श्रीरामाजवळ उपस्थित झाले. त्यांना पाहून हात जोडून उभ्या असलेल्या रामाला ते सूरश्रेष्ठ म्हणाले,
‘तूच कर्ता या विश्वाचा, ज्ञाता, श्रेष्ठ विभू,
अग्निदिव्याची सीतेच्या, का अपेक्षा प्रभू?
का उपेक्षसी वैदेहीला, प्राकृत मनुष्यासम?
का न जाणसी स्वत:स अजूनी,
तूच पुरुषोत्तम’
तेव्हा श्रीराम त्यांना म्हणाले,
‘मानतो मी स्वत:स माणूस, दशरथपुत्र राम,
देवा सांगा तथापि मजला वस्तुत:
मी कोण?’
श्रीरामाने असे विचारल्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणाले, ‘श्रीनारायण, चक्रायुध प्रभू,
तूच असशी रामा’,
तूच वराह, काल शत्रूचा जेता, तूच रामा’
तूच अक्षरब्रह्म सत्य, सर्व काली, रामा,
परमधर्म लोकांचा, चतुर्भुज, विष्णू तू रामा’
हृषिकेश तू अजित पुरुष, पुरुषोत्तम रामा,
खड्गधारी, महाबलशाली, कृष्ण तूच रामा’
बुद्धी सत्य, क्षमा निग्रह, सृष्टी तूच रामा,
प्रलयाचे कारण तू, उपेंद्र, तूच रामा’
परमात्मा तू हृदयामधला,
विराट पुरुष रामा,
अस्तित्व ना जगा तुज्याविण,
विश्वच तू रामा’
सीता साक्षात असे लक्ष्मी,
विष्णू तूच रामा,
दिव्यरूपधारी परमात्मा, असे तूच रामा’
श्रीरामाला तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, याची जाणीव केली. त्याआधीही परशुरामाने रामाचे अवतारित्व घोषित केले होतेच! रावणवधासाठी मनुष्यदेह धारण केला होता. राम, आत्माराम, त्याला त्रिवार वंदन...!