Gudhi Padwa Special : गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा विधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:10 PM2019-04-05T13:10:00+5:302019-04-05T13:10:44+5:30
गुढी पाडव्याचा सण हा अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदाचा गुढीपाडव्याचा सण ६ एप्रिल, २०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
गुढी पाडव्याचा सण हा अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदाचा गुढीपाडव्याचा सण ६ एप्रिल, २०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार, या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. त्याचसोबत हिंदू धर्मात पाडव्याच्या सणाबद्दल अनेक रुढी आणि परंपरा आहेत.
शुभ मुहूर्त
या दिवशी येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी शुभ मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ ५ एप्रिल २०१९ ला ११.५० असून त्याची समाप्ती ६ एप्रिल २०१९ ला १२.५३ मिनिटांनी होणार आहे. तसेच या दिवशी लोक सकाळी लवकर उठून घरातबाहेर पांढरी रांगोळी, तोरण लावून घराला सजवतात. त्याचसोबत घरात गुढी उभारली जाते.
गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जात असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यावर स्वतिकचे चिन्ह काढून त्यावर रेशमी कापडसह गुढी उभारली जाते. तसेच घरातील मंडळी पारंपरिक पोशाखात गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. या दिवशी सुंदरकांड, रारक्षास्रोत्र, देवी भगवती यांच्या नावाच्या मंत्रांचा जाप केला जातो.
जाणून घेऊया या सणाच्या महत्व
हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा दिवस वर्षातील पहिला दिवस मानला जातो. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.
ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस.
तसेच याच दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
असं केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत
ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मदेवानं जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस.