GudhiPadwa : मित्र-मैत्रिणींना, प्रियजनांना 'या' मेसेजेसने द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 09:29 AM2020-03-25T09:29:08+5:302020-03-25T09:30:51+5:30

घरातून बाहेर न पडता तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तींना मॅसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.  

GudhiPadwa: Gudhi padwa special here are facebook status whatsapp messages | GudhiPadwa : मित्र-मैत्रिणींना, प्रियजनांना 'या' मेसेजेसने द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

GudhiPadwa : मित्र-मैत्रिणींना, प्रियजनांना 'या' मेसेजेसने द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

googlenewsNext

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पण सध्या कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर  गुढीपाडवा आपल्याला साजरा येणार नाही.  म्हणजेच घराबाहेर पडता येणार नाही अशा स्थितीत तुम्ही  आपल्या प्रिय व्यक्तींना मॅसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.  

चैत्राची सोनेरी पहाट, 
नव्या स्वप्नांची नवी वाट, 
नवा आरंभ, नवा विश्वास, 
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात! 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाची नवी ही सुरुवात, 
सुरुवात करु नवीन क्षणांची, 
या मंगल दिनाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!


श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, 
नव वर्ष जावो छान! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शांत निवांत शिशीर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, 
कोळीळेच्या सुरुवाती सोबत, चैत्र-पाडवा दारी आला! 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे, 
सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे, 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


भल्या सकाळी, गुढी उभारू, नवं वर्षाचे करू स्वागत, 
सामील होऊ शोभायात्रेत, आनंदाची उधळण करीत…
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.


मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक, 
सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


Gudhi Padwa Special: Here are Facebook Status, WhatsApp Messages | GudhiPadwa Special : मित्र-मैत्रिणींना, जवळच्यांना या मेसेजने द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

सर्व रस्ते सजले आहेत, छान सुंदर रांगोळ्यांनी,  
शोभा यात्रा फुलुनी गेली, माणसांच्या ताटव्यानी….
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.


 Corona Saw on Gudi Padwa! | गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट !

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? 
पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….
थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृषारोपण,  
झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू, पर्यावरणाच्या गुढीसंगे, 
करू नववर्षाचे स्वागत…“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.


चला उभारू पुन्हा आता, पर्यावरणाची गुढी, 
स्वागत करू नववर्षाचे, पोचवू हा संदेश घरोघरी….
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.


सोनपिवळ्या किरणांनी आले नववर्ष, 
मराठी मन्मनी दाटे नववर्षाचा हर्ष…
गुढीपाडव्याच्या सोनपिवळ्या शुभेच्छा!

सोनपिवळा स्पर्श, हिरव्या गर्दिला स्रूजनांचा हर्ष, 
कुणाच्या स्वागता हा सोहळा?, 
गुढीपाडव्याचा मुहुर्त आगळा, 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ( हे पण वाचा-Gudipadwa : घरच्याघरी साध्या पध्दतीने 'अशी' गुढी उभारून साजरा करा यंदाचा गुढीपाडवा!)

Web Title: GudhiPadwa: Gudhi padwa special here are facebook status whatsapp messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.