मन आकंठ आनंदे आवडी भरीन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 07:00 PM2020-05-16T19:00:04+5:302020-05-16T19:00:57+5:30

अवास्तव अपेक्षा न बाळगता आनंदी राहावयास शिका. 

Happiness in create in mind | मन आकंठ आनंदे आवडी भरीन...

मन आकंठ आनंदे आवडी भरीन...

Next

डॉ. दत्ता कोहिनकर

मित्रांनो, मनावर येणारा ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी माणसे जोडा, एकलकोंडेपणा सोडा, वेळेचे व्यवस्थापन करा, व्यायाम करा, तोंडात लाळ तयार करून ती गिळा (लाळेत अँड्रानील असते, त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते), म्युझिक विशेषतः शास्त्रीय संगीत ऐका, योगा व प्राणादेह सुखाचे मंदिर...  याम करा. आहार , विहाराच्या व्यवस्थापनाला महत्त्व द्या. 

मनात येणारे विचार - एका फुलस्केप पेपरवर कसलाही विचार न करता भराभर लिहा व ते परत न वाचता फुलस्केप फाडून टाका. (यामुळे दबलेल्या भावनांना रिलीफ मिळतो), पंधरवडयातून एकदा पायाचा घोटा बुडेल एवढया गरम पाण्यात मुठभर मीठ टाकून त्यात पाच मिनिटे पाय ठेवून बसा, आवडता छंद जोपासा, लहान मुलांबरोबर खेळा,घरातील पाळीव प्राण्यांशी खेळा, लोक काय म्हणतील हयावर जास्त विचार करू नका, भावनांचे दमन करू नका, कधी ओरडावेसे वाटले तर ओरडा, मारावेसे वाटले तर उशीवर गुद्दे मारा, नाचावेसे वाटले तर नाचा, रडावेसे वाटले तर रडा, हसावेसे वाटले तर बिनधास्त हसा.
कामभावनांच दमन करु नका. वेळोवेळी शरीराला मसाज व स्टीम द्या, टाळया वाजवा, सकारात्मक विचार करा.
मनाला सकारात्मक स्वयंसूचना द्या...
 बागकाम करा,सर्वात महत्वाचे रोज सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे शांतपणे मांडी घालून बसा व डोळे बंद करुन येणार्‍या व जाणार्‍या श्‍वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा. श्‍वासाला आकडा-आकृती-मंत्र याची जोड अजिबात देऊ नका. शुद्ध व स्वाभाविक श्‍वासाचे तटस्थपणे निरिक्षण हा तणावातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे. 
या पुज्य आचार्य गोएंका गुरुजी यांच्या व्हिडीओची  अवश्य मदत घ्या .
समजा नैराश्याचे प्रमाण जास्तच वाटले-आत्महत्येपर्यंतचे विचार मनात घोळू लागले. तर मात्र मेंदूमध्ये काही रासायनिक घटकांची कमतरता झाल्याने जीव रासायनिक असंतुलन होते. ते घटक वाढवण्यासाठी त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. मानसोपचार तज्ञांकडे जाणे म्हणजे आपण वेडे आहोत असे मुळीच नाही. अमेरिकेत 60 % लोक कधी ना कधी मानसोपचार तज्ञांची मदत घेतात. अवास्तव अपेक्षा न बाळगता आनंदी रहावयास शिका. 

Web Title: Happiness in create in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.