हर हर महादेवच्या जयघोषात १०८ महिलांची कावड यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:52 PM2019-07-29T12:52:02+5:302019-07-29T12:54:16+5:30

पावसासाठी महादेवाला साकडे: हजारो भाविकांचा सहभाग

Har Har Mahadev: womens Kawad Yatra | हर हर महादेवच्या जयघोषात १०८ महिलांची कावड यात्रा

हर हर महादेवच्या जयघोषात १०८ महिलांची कावड यात्रा

googlenewsNext

जळगाव : हर हर महादेव, बम बम भोले, बोलो शंभू महादेव की जय असा जयघोष करीत, वारकरी, भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भजनांच्या स्वरात शहरात सोमवारी सकाळी सोमप्रदोषदिनी १०८ महिलांनी कावड यात्रा काढली. भरपूर पाऊस पडू दे म्हणून भाविकांनी महादेवाला साकडे घातले.
येथील संस्कार परिवार आणि श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थानतर्फे महिलांची भव्य १०८ कावड यात्रा शहरात काढण्यात आली. सकाळी ७ वाजता चिमुकले राम मंदिर देवस्थान येथे ह.भ.प दादा महाराज जोशी यांचे हस्ते कावडांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविक महिलांनी तांब्याच्या २ कळसांसह जरीच्या कापडाने सजविलेल्या कावड घेवून यात्रेत सहभागी झाल्या. कळसांमध्ये समुद्रासह नर्मदा, गंगा, गिरणा यांचे जल भरून यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेमध्ये वारकरी मंडळाने टाळ मृदुंगासह भगवान महादेवाचा जागर केला. तसेच भजनी मंडळांनी देखील भजन म्हणत शहरातील वातावरण भक्तीमय केले. यावेळी हर हर महादेव, ओम नम: शिवाय चा जप करीत यात्रेत हजारो भाविकही सहभागी झाले.यात्रेचा नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यवीर चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक मार्गे ओंकारेश्वर देवस्थान येथे समारोप झाला. यात्रेत महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक वेशभूषा केली होती.

Web Title: Har Har Mahadev: womens Kawad Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव