स्वर्ग आणि नरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:30 AM2018-03-20T03:30:07+5:302018-03-20T03:30:07+5:30
विश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय.
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय
विश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय. वेगवेगळ्या धर्मांमध्ये या उपासना पध्दती व कार्यसंहिता वेगवेगळ्या असल्याने धर्माचारणाचे सुध्दा वेगवेगळे प्रकार सांगितले गेले आहेत. स्वर्ग आणि नरकाच्या परिकल्पनेत एक साम्य दिसून येते, ते हे की, स्वर्ग किंवा नरक मृत्यूनंतर प्राप्त होतात.
परंतु काही भारतीय विचारवंतांच्या मते हे स्वर्ग व नरक या शरीरात किंवा या जगातच आहेत. योगशास्त्र, ज्ञानशास्त्र व संतसाहित्यात या विचारांचा प्रभाव दिसून येतो. या विचारधारेच्या लोकांचे असे मत आहे की, आपले विचार, वचन व कर्म आपल्यासाठी स्वर्ग किंवा नरक निर्माण करतात. स्वर्ग एक अशी जागा आहे, जिथे केवळ आनंद असतो, काही ठिकाणी स्वर्गाची कल्पना भोगांनी भरलेल्या जागेच्या रूपात केलेली आहे. हा आनंद किंवा सुखाचा उपभोग आपल्या विचारातून उत्पन्न होतो. सत्य आणि सकारात्मक विचार आपल्या मनात सकारात्मक कंपन निर्माण करतात, ज्यामुळे आपल्याला सुखद अनुभव मिळतो. हेच सकारात्मक विचार जेव्हा वाणीचे रूप धारण करतात तेव्हा मानव स्वत: सुखी होतो व तो दुसऱ्यांनाही सुख देतो. जेव्हा हे सकारात्मक विचार कर्माचे रूप धारण करतात तेव्हा जगात व व्यक्तिगत जीवनात सुखाचे आगमन होते व सुखद वातावरण निर्माण होते. खºया अर्थाने हाच स्वर्ग आहे.
याउलट अशुध्द, नकारात्मक व विध्वंसात्मक विचार मानवाच्या मनात उत्तेजना व नकारात्मक कंपन निर्माण करतात. हे नकारात्मक विचार नकारात्मक वचनाच्या रूपात प्रकट होतात, जे स्वत:ला व दुसºयांनाही घातक ठरतात. या प्रकारचे विचार जेव्हा कर्माच्या रूपात प्रकट होतात तेव्हा जीवनात विध्वंस व नाश उत्पन्न करतात. वस्तुत: हाच नरक आहे.भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवत्गीतेमध्ये काम, क्रोध व लोभ या तीन गोष्टींना नरकाचे दार संबोधलेले आहे. काम, क्र ोध व लोभ हे सर्व अनर्थ व दुष्कृत्यांचे मूळ कारण आहे. या जगात होणाºया अपराधांचे जेव्हा आपण विश्लेषण करतो, तेव्हा असे लक्षात येते की या सर्व अपराधाचे मूळ कारणच हे काम, क्रोध व लोभ आहेत.