बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:08 AM2020-01-07T05:08:40+5:302020-01-07T05:08:51+5:30

स्वावलंबन हा त्याचा गुण आहे. तो कधीच परोपजीवी नसतो. तो कुणाला झिजवत नाही, राबवत नाही.

 How can the unemployed be educated and the well educated useless? | बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा?

बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा?

Next

- बा.भो. शास्त्री
स्वावलंबन हा त्याचा गुण आहे. तो कधीच परोपजीवी नसतो. तो कुणाला झिजवत नाही, राबवत नाही. हेच स्वावलंबन स्वत:ला, समाजाला व देशाला मोठं करतं. त्याच्या कष्टातून ईष्ट जन्माला येतं. जीवन सुखी होतं, सुशिक्षित बेकार हा शब्द किती विचित्र आहे. बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा? अशिक्षिताच्या कारखान्यात सुशिक्षित बेकार वॉचमन होतो. स्वत:ची भाकरी न कमवता आईच्या कष्टाच्या भाकरीवर जगणारा सुशिक्षित कसा? वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराज स्वत:च्या पराक्रमाने माऊली किल्ला जिंकतात म्हणूनच त्यांना ‘‘यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत’’ असं समर्थ म्हणाले. इथंच थांबलं नाही तर ‘श्रीमंतयोगी’ असंही म्हटलं आहे. तपात संयम असतो. संयमाला यम घाबरतो. थोडासा संयम असेल तर रोडवर गाड्यांचं अपघाताचं प्रमाण घटेल. मोबाईलचं संकट टळेल. असंयम हाच अवघ्या अपघाताचा जनक आहे व तितिक्षा हीच तपश्चर्या आहे. तपश्चर्या कालबाह्य झाली असं कसं म्हणता येईल? शाश्वतमूल्यं कधीच कालबाह्य होत नसतं. शास्त्रज्ञ संशोधनासाठी घेत असलेले कष्ट, शेतकरी व कामगारांचे कष्ट, सीमेवर लढणाऱ्या जवानांचं समर्पण आई-बाबा हे तपातच मोडतात. एका मराठी भावगीतात परपुष्ट संन्याशाबद्दल म्हटलं आहे.
‘‘रुद्राक्षांच्या गळ्यात माळा
लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती
पिकविलेस मातीतून मोती
काय अभाग्या भगवे नेसून
घर संन्यसून जासी’’
आळशी व ऐतखाऊ लोकांमुळे तपाचा अर्थ धूसर झाला. नियमित व्यायाम, वाणीची स्वच्छता, निर्मळ दृष्टी, स्वकष्टार्जित धन, शुद्ध आहार व सहिष्णुता या सद्गुणांचा समूह हचा तपसाधना आहे.

Web Title:  How can the unemployed be educated and the well educated useless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.