आपण आपलं जीवन कस जगतोय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 03:03 PM2020-06-12T15:03:55+5:302020-06-12T15:04:01+5:30

प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का ...

How do you live your life | आपण आपलं जीवन कस जगतोय ?

आपण आपलं जीवन कस जगतोय ?

googlenewsNext

प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. मात्र, बरेच जण आपल्यासारखंच आयुष्य जगण्याचं स्वप्न रोज पहात असतात. मोटारीतून फिरणाºया माणसाला विमानातून जाणा?्यांचा हेवा वाटतो, तर दररोज विमानात बसणाºयांना मोटारीतून जावं वाटतं. हा सगळा मनाचा खेळ आहे.

मनाच्या रस्त्याला भलतीकडे जाण्यापासून रोखले तर मनस्ताप होत नाही. मनस्ताप होण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अपेक्षा. आपण स्वत:पासून आणि इतरांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो कि, वेळोवेळी आपला मनोभंग होतो. त्यामुळे वास्तवाचं भान ठेवून अवास्तव अपेक्षा ठेवणं थांबवलं पाहिजे. स्वत:च्या भावना जाणून घेऊन त्यानुसार काम करणं, हेदेखील मन:स्वास्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. एखादी परिस्थिती आपण बदलू शकणार नाही. मात्र, तिला सामोरं कसं जायचं, हे तर नक्कीच ठरवू शकतो. आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती आपलं मन आपल्याला देत असते. त्यामुळे मन ताब्यात असलं कि सगळं साध्य करणं अगदी सोप्प आहे.

सध्याचं युग हे प्रचंड स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचं युग. गतीची भयंकर सक्ती असलेला काळ. ह्यथांबला तो संपलाह्ण हा नियम बनवून प्रत्येकजण धावत सुटलाय. कुणाला कुणाशी बोलायलासुद्धा वेळ नाही. कानाला इअरफोन आणि हातात मोबाईल घेतलेला आजचा माणूस जगाशी कनेक्ट असेलही, मात्र आपल्या माणसांपासून तो दुरावला आहे.

भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सोभावाताली, या हृदयाची त्या हृदयाला रेंज मिळेना..गझलकार प्रसेनजीत गायकवाड यांच्या या ओळीप्रमाणे संवादाच्या रेंज पासून माणसं आऊट आॅफ कव्हरेज होतायेत. इतरांशी मनमोकळं बोलणं सोडा, माणसं स्वत:शी ही बोलत नाहीत. नुसती स्पर्धा आणि पैशाची हाव, यातच आपण गुरफटून गेलोय. बरं, नेमकं काय हवंय, हे तरी आपल्याला कळतंय का? कधी आपण आपल्या अपयशाने खचुन जातो, तर कधी दुसºयांचं यश पाहून आपल्याला मनस्ताप होतो. काय करावं? याबाबतही अनेकांचा नुसताच गोंधळ आहे. टु बी आॅर नॉट टु बी हा प्रश्न विचारणारा हॅम्लेट प्रत्येकाच्याच मनात क्षणोक्षणी आपले नाट्य सादर करीत असतो. या ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनशैलीमुळे कित्येकांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली तर ठीक, नाहीतर होणाºया मनस्तापामुळे अनेकजण खचून जातात. वेडावाकडा निर्णय घेतात. आज वाढलेल्या आत्महत्येच्या संख्येमागे मनस्ताप हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे हा मनस्ताप कमी करण्यासाठी आपण आपल्या मनाशी मैत्री केली पाहिजे. इतरांशी तुलना करून त्यांचा हेवा, मत्सर द्वेष करण्यापेक्षा आपण कसं जगतोय, याचं चिंतन केलं पाहिजे.
- ह.भ.प. लक्ष्मण सुतार महाराज
सोलापूर

Web Title: How do you live your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.