योगाभ्यास, ध्यानसाधनेचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 04:17 AM2019-09-25T04:17:30+5:302019-09-25T04:17:41+5:30

तुम्ही करत असलेला योगाभ्यास, ध्यानसाधनेशी तुमचा जोडीदार सहमत नसेल, तर काय करावं आणि याचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

how one should tell the importance of yoga | योगाभ्यास, ध्यानसाधनेचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

योगाभ्यास, ध्यानसाधनेचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

Next

- सद्गुरू जग्गी वासुदेव

तुम्ही करत असलेला योगाभ्यास, ध्यानसाधनेशी तुमचा जोडीदार सहमत नसेल, तर काय करावं आणि याचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं? तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेत जोडीदाराचं सहकार्य हवं असेल, तर तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रक्रिया त्याच्यासाठी फायदेशीर बनविली पाहिजे. योगाभ्यासामुळे तुम्ही किती उत्साही, आनंदी आणि अद्भुत झालात हे त्याने पाहिलं पाहिजे. मग तो म्हणेल, ‘चल, ध्यान करू या! तू आज तुझी ध्यानधारणा केलीस का?’ परंतु तुमची आध्यात्माची संकल्पना जर तुमच्या कुटुंबाला असं सांगण्याची असेल की, ‘मी आजपासून जेवण बनवणार नाही, मी तुम्हाला फक्त शेंगदाणे खायला देणार. भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये सर्व काही असतं, असं मला ईशायोगामध्ये सांगण्यात आलं आहे,’ तर मात्र हे लागू पडणार नाही. तुम्ही हे पाहिलं पाहिजे की, तुमची योग साधना त्याच्या कामी येत आहे आणि तो ज्याला ओळखायचा त्याहून कितीतरी अद्भुत व्यक्ती तुम्ही आज बनला आहात. मग तो खात्रीने तुम्ही तुमच्या सकाळच्या क्रि या करत आहात का याकडे लक्ष देईल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं कल्याण साधलं जात आहे, पण अशीही काही कुटुंबे आहेत, जिथे कुणी १५ मिनिटे जरी ध्यान करत असेल, तर येतील आणि त्यांना हलवत म्हणतील, ‘तू डोळे बंद करून का बसला आहेस?’ तुम्ही जर अशा परिस्थितीत सापडला असाल, जिथे प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध होत आहे, जिथे सर्वांना प्रत्येक लहान-सहान गोष्टींबद्दल असुरक्षितता वाटते; मग तुम्हाला कुटुंब आहे, असं मला वाटत नाही. क्षमा करा, मी फार निर्दयी आहे, पण याचा सामना करू या. कुटुंब म्हणजे २ किंवा ४ लोक, जे एकमेकांच्या कल्याणासाठी झटत आहेत. त्यांना एकमेकांविषयी आस्था आहे. पण जर तिथं काहीच काळजी नसेल, तर मग तुम्हाला खरंच कुटुंब नाही. या गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची हीच वेळ आहे.

Web Title: how one should tell the importance of yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.