कसे असावे आपले घर? वास्तू टिप्स भाग 15

By admin | Published: January 23, 2017 12:59 PM2017-01-23T12:59:40+5:302017-02-27T16:59:23+5:30

नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृह प्रवेश न करता विधिवत योग्य शुभ - मुहुर्ताला वास्तुशांत करून रहायला जावे म्हणजे वास्तू लवकरात लवकर लाभते .

How should your home be? Vastu Tips Part 15 | कसे असावे आपले घर? वास्तू टिप्स भाग 15

कसे असावे आपले घर? वास्तू टिप्स भाग 15

Next

 

- नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृह प्रवेश न करता विधिवत योग्य  शुभ - मुहुर्ताला  वास्तुशांत  करून रहायला जावे म्हणजे वास्तू लवकरात लवकर लाभते. 

 
- ग्रह बल वाढविण्यासाठी योग्य वास्तु  तज्ञाकडुन आपल्या घराची व्हिजिट करून घेणे आणि योग्य ज्योतिषाकडून पत्रिका दाखवुन ग्रह दोष निवारण करून घेणे .
 
-  यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवन शैली , सदवर्तन , नम्रपणा ,  दानशुरता , संयमी वृत्ती या पाच  गोष्टींचा भरपूर उपयोग होतो .
 
- मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कपड्यांचे रॅक किंवा किल्ल्यांचे रॅक लावुन ठेवू नये .
 
- घराच्या मुख्य दरवाजासमोर घरातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा फॅमिलीचा ग्रुप फोटो लावु नये . 
 
- घरातील फॅमिली फोटो हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावावा म्हणजेच दक्षिण भिंतीवर उत्तरेला तोंड करून आणि पश्चिम भिंतींवर पूर्वेला तोंड करून लावावा.
 
- घरातील कुटुंबांच्या सुख -समृद्धी साठी फॅमिलीचा एकत्रित फोटो दक्षिण ,पश्चिम भिंतींवर लावावा.
 
- घरामध्ये सुख -समृद्धी साठी घरातील खोल्यांना वेगवेगळा रंग देऊ नये.
 
- बेडच्या समोर आरसा किंवा प्रतिबिंब पडेल अशी कोणतीही वस्तू ठेवू नये.
 
-  बेडरूम मध्ये वाहता धबधबा किंवा पाण्याचे चित्र लावू नये.
 
- घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये कोठेही बुडत्या  जहाजांचे , हेलकावे खाणाऱ्या बोटीचे चित्र लावू नये.
 
- घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये आदिवासी रडक्या,अश्रु वाहणाऱ्या, नैराश्य दाखवणाऱ्या अशा कोणत्याही स्त्री-पुरुषांची चित्र लावू नयेत .
- कोणत्याही बेडरूम मध्ये बेडच्या वरती लटकते झुंबर किंवा लॅम्प येऊ देऊ नये.
 
- घरात बेडरूम मध्ये दक्षिण भिंतीला आरसा येऊ देऊ नये. 
 
- मास्टर बेडरूम मध्ये एकट्या स्त्री, दु:खी,रडलेल्या स्त्रीचे चित्र लाऊ नये. हसती-खेळती चित्र लावावीत .
 
- घरामध्ये डार्क पिवळा रंग देऊ नये , हा रंग पोटाचे आजार वाढविणारा असतो .
 
 
- घरामध्ये भिंतीला लाल भडक रंग देऊ नये यामुळे घरात चिडचिड वादविवाद भांडणे आणि उष्णते संबंधी विकार होऊ शकतात.
 
 
- घरामध्ये डार्क गुलाबी , बेबी पिंक असे कलर देऊ नये यामुळे ढेकुण , कृमी किटक , जाळ्या जळमटे , कोळ्याची घरटी असे लागतात .  
 
- घरात सिलिंगला फक्त व्हाईट कलर दयावा, कोणतेही डार्क रंग देऊ नये त्यामुळे आकाश तत्त्व बिघडते.
 
- घराच्या नॉर्थ आणि ईस्ट भिंतीला डार्क रंग किंवा अवजड फर्निचर ठेऊ नये .
 

 

Web Title: How should your home be? Vastu Tips Part 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.