घरात देव्हारा असेल तर या गोष्टींची न विसरता घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 04:30 PM2018-04-05T16:30:53+5:302018-04-05T16:30:53+5:30
अनेक रंगीबेरंगी डिझाईन असलेले देव्हारे तयार करून घेतले जातात. पण घरात देव्हारा असल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
देवावर श्रद्धा ठेवणारे लोक हे मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातातच, त्यासोबतच ते आपल्या घरातही एक छोटंसं मंदिर म्हणजे देव्हारा तयार करून घेतात. जेणेकरून त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे देवाची पूजा करता यावी. वयोवृद्ध लोकांना तर याची सवय झाली असते. अलिकडे शहरांमध्ये तर घरात देव्हारा असण्याला अधिक महत्व दिलं जातं.
अनेक रंगीबेरंगी डिझाईन असलेले देव्हारे तयार करून घेतले जातात. पण घरात देव्हारा असल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमची श्रद्धा आहेच तर मनापासून पूजा करण्यातच जास्त महत्व असतं. वरवर करून तुमच्या मनालाही शांती मिळणार नाही. त्यामुळे या खालील गोष्टी लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे.
१. वास्तू शास्त्रानुसार देव्हारा किंवा पूजा घर उत्तर दिशेकडे असायला हवे.
२. मंदिर/देव्हारा पश्चिम-दक्षिण दिशेकडे असणे अशुभ मानले जाते.
३. देव्हारा हा वरती असू नये. तसेच आजूबाजूला शौचालय असू नये.
४. देव्हारा स्वयंपाक खोलीत नसावा. ते चांगले नसते.
५. मंदिरात दोन देवांचे दोन फोटो असतील तर ते समोरा समोर नकोत.
६. देवाच्या मूर्ती असतील तर दोन मूर्तींमध्ये १ इंचाचं अंतर असावं.
७. एकाच घरात एकापेक्षा जास्त देव्हारे नकोत. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहत नाही, असे मानले जाते.
८. वरच्या मरल्यावर जाण्यासाठी असलेल्या पाय-यांखाली किंवा तळघारात मंदिर असू नये. त्यामुळे पूजापाठ केल्याचा लाभ होत नाही., असेही मानले जाते.
९. ज्या बाजूला मंदिर किंवा देव्हारा असेल, त्या दिशेने झोपताना पाय करुन झोपणे चांगले नाही, अशी मान्यता आहे.