जन्मदात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 03:12 AM2019-06-18T03:12:41+5:302019-06-18T03:13:36+5:30

आईची हेळसांड ज्या घरात होत असते त्या घराला आई जिवंत असताना कळत नाही व गेल्यावर मिळत नाही, एवढं तरी कळायला हवं.

importance of mother | जन्मदात्री

जन्मदात्री

Next

- बा.भो. शास्त्री

ऋषी परमेश्वराची प्रार्थना करताना म्हणतात,
‘त्वमेव माताच पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वां मम देव देव’
या श्लोकात परमेश्वराला आधी आई म्हणतात. शेवटी देवाचा उल्लेख करतात. वेदांनी देवांचं देवत्व मान्य करूनही आईबद्दल आपलं मत व्यक्त करत असता, ‘न मातु:पर दैवतम्’ असं म्हटलं आहे. स्वामी आईची उंची सांगताना एका सूत्रात म्हणतात, ‘मातेचे स्नेह ते नैसर्गिक.’ येथे आईच्या स्नेहाचं वर्णन करताना तिला स्नेहाचा नैसर्गिक झरा म्हटलं आहे. असं खरं तर हे सूत्र आईचं एका ओळीचं मंगल स्तोत्रच आहे. स्वामी लौकिक अर्थाने मातृभक्त होते. ते जेव्हा शपथ घेतात तेव्हा आईचीच शपथ घेतात. शपथ ही अढळ प्रतिज्ञा असते. ‘मालुबाईची आण’ असं ते म्हणत माल्हणदेवी हे त्यांच्या आईचं नाव होतं. आई जन्म देणारीच असते असं नाही. स्वामींनी बोणेबाईला आई म्हटलं आहे. एवढंच नाही यशोदेसारखाच पुतनेलाही त्यांनी आईचा दर्जा दिला आहे. खरं तर तिने कृष्णाला विष पाजलं, पण स्तनातून पाजलं म्हणून आई म्हटलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनाही सर्व वारकरी माउली म्हणतात. वात्सल्य असेल तर पुरुषालाही माता म्हणता येतं. त्यांनी ज्ञान पाजून बुद्धीचं पोषण केलं म्हणून माउली. आईची हेळसांड ज्या घरात होत असते त्या घराला आई जिवंत असताना कळत नाही व गेल्यावर मिळत नाही, एवढं तरी कळायला हवं. ती देवाची प्रतिनिधी आहे.
तिलाच रामाने स्वर्गापेक्षा श्रेष्ठ म्हटलं आहे.
‘अपि स्वर्णमयि लंका लक्ष्मणा मे न रोचते
जननी जन्मभूमिश्च स्वर्गिदपि गरियसि’
तिच्या दुधाचे उपकार विसरण्यासारखे नाहीत. या सावलीला उन्हात ठेवणारी नादान मुलंही जन्माला येतात.

Web Title: importance of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.