जेजुरीचा खंडेराया अवतरला खामगाव नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:21 PM2019-12-25T15:21:51+5:302019-12-25T15:23:00+5:30

गेल्या बत्तीस वषार्पासून ‘खंडोबारायाचा  भव्य नंगर सोहळा’ अतिशय धूमधडाक्याने साजरा केल्या जातो .

Jejuri khanderaya arrived in Khamgaon | जेजुरीचा खंडेराया अवतरला खामगाव नगरी

जेजुरीचा खंडेराया अवतरला खामगाव नगरी

googlenewsNext

खामगाव : ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्, संशयात्मा विनश्यति’ असे भगवदगीतेत भगवंताने अजुर्ना  ला सांगितले आहे . अर्थात जी व्यक्ती श्रद्धावान आहे तिलाच ज्ञानाची प्राप्ती होते आणि जे संशय करतात त्यांचा विनाश होतो. श्रद्धेला मोल नाही अशी आपली संस्कृती सांगते , तर आदि शंकराचार्य यांनी त्यांच्या विवेकचूडामणी या ग्रंथात तीन गोष्टींना अत्यंत दुर्लभ मानले आहे.त्या म्हणजे मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि सत्संगत्वम . अर्थात मनुष्याचा देह प्राप्त होणे दुर्मिळ आहे आणि मनुष्याला मोक्षप्राप्तीची इच्छा होणे त्याहून दुर्मिळ आहे.त्याहूनही अति दुर्मिळ काय असेल तर ते म्हणजे  सत्संगाची प्राप्ती होय. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यात धार्मिक सणांची खूप रेलचेल असते. या महिन्यात गीता जयंती, वैकुंठ एकादशी ,दत्त जयंती. गुरुचरित्र सप्ताह इत्यादी सण येतात .याच महिन्यात कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश दिला. हा गीतोपदेश केवळ अजुर्नासाठी नाही तर संपूर्ण मानवी कल्याणासाठी आहे. याच महिन्यात जेजुरीला खंडोबारायाचा  महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. खंडोबाची मल्हारी मार्तंड म्हणूनही कर्नाटक आणि महाराष्ट्रात ओळख आहे. खंडोबारायाचा हा महोत्सव कर्नाटक आणि महाराष्ट्रात अतिशय मोठ्या थाटात साजरा केल्या जातो. याच महोत्सवाचा एक भाग म्हणजे चंपाषष्टी  महोत्सवही साजरा होतो. चंपाषष्टीच्या सहा दिवस चालणाºया महोत्सवात सहभागी झाल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.  वैभव आणि सुख शांती मिळते. सर्व पापांचा नाश होतो अशी भक्तांची अपार श्रद्धा आहे. या दिवसात देवासमोर अखंड दीपज्योत तेवत ठेवतात.
चंपाषष्टीची कथा अशी आहे की, मणी आणि मल्ल या दोन राक्षस बंधूंनी ऋषिमुनींचच नव्हे तर देवांचे आणि सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले होते .  देवगणांनी भगवानशंकराला प्रार्थना केली. या दोन राक्षसांच्या तावडीतून आपली सुटका करा अशी विनवणी केली तेव्हा भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला. खंडोबाचे शरीर हळदीने माखलेले होते. भगवान शंकर आणि या राक्षस बंधूंचे घनघोर युद्ध झाले .या युद्धात मणी हा राक्षस भगवान शंकराला शरण आला. त्याने आपला पांढरा शुभ्र घोडा भगवान शंकर यांना भेट दिला, मला तुमच्याच चरणी आश्रयास ठेवा अशी प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकराने त्याला आपल्या चरणी आश्रय दिला. आजही खंडोबाच्या मूर्तीच्या जवळ या मणीची मूर्ती ठेवली जाते. मात्र  मणीचा दुसरा भाऊ राक्षस मल्ल याने मात्र  हिंसेचा मार्ग पत्करला तेव्हा भगवान शंकरांनी त्याला यमसदनी पाठवले. अशी ही कथा आहे. विशेष हे की जेजुरीच्या खंडोबारायाच्या महोत्सवाची प्रतिकृती विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीत मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. खामगावच्या श्री शिव खंडोबा भक्त मंडळ आणि शिव खंडोबा महिला भजनी मंडळ यांच्या वतीने गेल्या बत्तीस वषार्पासून ‘खंडोबारायाचा  भव्य नंगर सोहळा’ अतिशय धूमधडाक्याने साजरा केल्या जातो . खामगावच्या शिवाजी वेस मध्ये खंडोबाचे फार प्राचीन मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात खंडोबारायाची घोड्यावर स्वार असलेली अति भव्य अशी पितळेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार जयंत विष्णुपंत विंचुरकर यांनी अहोरात्र परिश्रम करून ही २३१ किलो वजनाची आणि सात फूट  उंचीची अतिशय देखणी मूर्ती बनवली आहे. उल्लेखनीय म्हणजे या मूर्ती बनविण्याची मजुरी तीन-चार लाख रुपये झाली असती पण खंडोबाराया प्रती असलेल्या श्रद्धेच्या पोटी मूर्तिकार जयंत विंचुरकर यांनी पारिश्रमिक म्हणून एक रुपयासुद्धा घेतला नाही. मूर्ती तयार झाल्यानंतर मंडळाच्या   आनंद थानवी ,नाना देशमुख ,राजू कोल्हे, रवी भवरे ,रवी भावरे ,विजू उगले ,जयंत विंचुरकर ,सागर हेरोडे ,विष्णू पुरोहित , राजू कोल्हे , प्रकाश उखळकर, शिवा भाऊ मानेकर,  अमोल सराफ, संजय मुनोत  इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  ही मूर्ती प्रत्यक्ष जेजुरी गडावर नेऊन तिथे खंडोबाचा अभिषेक करून खामगावला आणल्यानंतर तिची उदंड उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली.
 विशेष हे की मंडळाच्यावतीने जो महाप्रसादचा अर्थात ‘प्रीती भोज’चा कार्यक्रम केला जातो. तो तर एक प्रकारची खामगाव  वासीयांसाठी पर्वणीच असते. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांच्या प्रीती भोजनाचा कार्यक्रम म्हणजे खंडोबा भक्तांच्या प्रीतीचे सामान्य माणसांना होणारे दर्शनच असते. मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक महिन्यापर्यंत अहोरात्र या उत्सवासाठी राबवतात. धर्म पंथ जात वंश अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष प्रचंड उत्साहात या खंडोबा महोत्सवात सहभागी होत असतात यामुळेच या महोत्सवातून एक प्रकारच्या सामाजिक जाणीवेचा, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा बोध देणारा संदेश सर्व राज्यभर दिल्या जातो समाज व्यसनमुक्त व्हावा अशी प्रार्थना मंडळ खंडोबारायाच्या चरणी करत असते.देशात सत्य ,धर्म, शांतता, प्रेम, सद्भाव आणि मानवता नांदो   अशीही मंडळाची प्रार्थना असते .हा महोत्सव विदर्भात एक अतिशय महत्त्वाचा उत्सव समजल्या जातो. जेजुरीचा खंडेराया अवतरला खामगाव नगरी ऐसा घोष करीत भक्त मंडळी दररोज'ुखालील अर्चना - प्रार्थना  करीत असतात.
सप्तऋषिस मनी मल्हारसुर गाजले भारी ।
 म्हणुनी अष्टभैरव मार्तंड अवतार धरी ।।

बनाईच्या तपाने देव मल्हारी झाले प्रसन्न।
खामगाव नगरी नगरी नंगर ठरला यावे वाघे जण।।

 भवसिंधु हा पार कराया कलियुगी साधन।

विसरू नको मानवा, मार्तंड चरणी लावी मन।।

- डॉ. गायत्री कालीदास थानवी
शिवाजी वेस, खामगाव.

Web Title: Jejuri khanderaya arrived in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.