आनंद तरंग - संवेदनशील व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 01:53 AM2019-10-30T01:53:35+5:302019-10-30T01:53:49+5:30

माझ्यातच आहेत,’ तेव्हा जे असभ्य आहे, ते बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही.

Joy Wave - Be Sensitive | आनंद तरंग - संवेदनशील व्हा

आनंद तरंग - संवेदनशील व्हा

Next

सद्गुरू जग्गी वासुदेव

आज जगात अहंकाराचा नायनाट करण्याबद्दल खूपच अनावश्यक चर्चा सुरू आहे. लोकांनी हे शास्त्रांमधून उचलले आहे. जेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व असभ्य, अभद्र बनते, तेव्हा त्याला तुम्ही अहंकार म्हणता. दोष दुसऱ्यांवर ढकलायचा, हा आणखी एक मार्ग आहे. जेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व अभद्र होते, तेव्हा तुम्ही त्याकडे हा ‘मी’ असंच पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याकडे ‘मी अभद्र, असभ्य झालो’ असे पाहाल, तेव्हा तुम्हाला त्याविषयी काहीतरी करावेसे वाटेल. जसे आहात, तसेच असणे तुम्हाला आवडणार होणार नाही, पण हे टाळण्यासाठी आपण कित्येक युक्त्या लढवत असतो. या क्षणी तुम्ही सभ्य असाल किंवा अभद्र असलात, तरी आहात ते तुम्हीच, हो की नाही? तसंच ध्यानात असू द्या. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या निर्माण करू नका. तुमचा अहंकार, तुमचा आत्मा किंवा आणखी काही. ज्या क्षणी तुम्ही, ‘जे छान आहे तो माझा आत्मा, आणि जे असभ्य आहे, तो माझा अहंकार,’ यासारख्या गोष्टी निर्माण करता, तेव्हा परिवर्तन घडवून आणणे अशक्य होते. जेव्हा तुमच्या असे लक्षात येते की, ‘मी जो कोणी आहे, सभ्य किंवा अभद्र, या दोन्ही
माझ्यातच आहेत,’ तेव्हा जे असभ्य आहे, ते बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही. आज जगामध्ये, आपल्याला एक साधी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. जीवनाप्रती जागरूकता. आज लोकांमध्ये फक्त अहंकाराची जाणीव आहे, जीवनाची जाणीवच नाही. ते अहंकाराविषयी संवेदनशील आहेत, जीवनाविषयी संवेदनशील नाहीत. जेव्हा तुम्ही अहंकाराविषयी संवेदनशील असता, तेव्हा जीवन म्हणजे केवळ तुम्ही, इतर काहीही जीवन नाही, या दृष्टिकोनातून स्वत:कडे पाहत असता. सर्वांना तुम्ही पायदळी तुडवू शकता. तुम्ही जर जीवनाविषयी संवेदनशील झालात, तर अहंकार ही समस्याच उरणार नाही.

Web Title: Joy Wave - Be Sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.