तुला जे करायचं ते कर; फक्त सर्वोत्तम कर.!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 08:56 PM2020-03-07T20:56:46+5:302020-03-07T20:57:07+5:30
म्हणून आपल्याला जे हवे तेच मुलाने करावे हा हट्ट सोडून द्या .
डॉ - दत्ता कोहिनकर
टिळकांनी मंडालेल्या तुरुंगातून मुलाला पत्र लिहिले होते , मॅट्रीकनंतर तुला जे काही करायचं ते कर . तु चप्पलंच दुकान टाकलं तरी चालेल पण लोक म्हटली पाहिजेत , तुम्हाला चप्पल घ्यायची का ? मग टिळकांच्या दुकानातूनच घ्या . जे काही करशील ते उत्तमातील उत्तम कर . सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी दोन - चार क्लास लावून मुलाला इंजिनियर बनवलं असतं . पण मग आज क्रिकेटचा बादशहा सचिन उदयास आला असता का ?
सचिन तेंडूलकर दहावीच्या परिक्षेत अनुतीर्ण झाला होता पण त्याच्या आवडत्या क्षेत्रात आई वडिलांनी सचिनला एवढे प्रोत्साहन दिले होते त्या प्रोत्साहनातून भारतरत्न सचिन तेंडूलकर उदयास आला ..
अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते . " माझ्या मुलाला जगात कसं जगावं , व विषम परिस्थितीत कसं वागावं हे शिकवा" . मित्रांनो अमेरिकेतून एम . एस . करून आलेल्या मुलाला मुंबईची लोकल पकडता येत नसेल तर काय उपयोग ? म्हणून त्याला तुझ्यापेक्षा कमी मार्क असून तो करतोय मग तुला काय अडचण आहे ? किंवा दोन्ही विषयांचे क्लास लावू . पण तेच कर , हा आग्रह पालकांनी सोडला पहिजे . मुलांच्या करियरसाठी अॅप्टीट्यूड , डीएमआयटी यासारख्या टेस्ट करून त्याच्या आवडीचे क्षेत्र त्याला निवडू द्या , *बरखा , लतादीदीसारखं गाऊ शकणार नाही . सगळेच पी . टी . उषा सारखे पळू शकत नाही . प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगवेगळा आहे .
म्हणून आपल्याला जे हवे तेच मुलाने करावे हा हट्ट सोडून द्या .
त्यांना वेळ , प्रेम , कौतुकाचे दोन शब्द द्या. त्यांच्या आवडीचे क्षेत्र त्यांना निवडू द्या . अन्यथा आपली मुले नैराश्याकडे जातील . पालकांनो तुमच्या मुलात एक सचिन तेंडूलकर , एक अब्दूल कलाम , एक अर्जित सिंग , एक प्रभू देवा दडला असेल त्याचा शोध घ्या. सारखं अभ्यास कर. म्हणून मुलांच्या मागे लागून त्यांना पुस्तकी किडे बनवू नका . तुमच्या मुलांना कधी कधी चौकात मित्रांमध्ये मिसळू द्या . चौकात मित्रमंडळीमध्ये तयार झालेली मुल ही आयुष्यात कितीही संकट येऊ द्या . कधीच आत्महत्या करत नाहीत . मुलांना स्वता आपले पंख मजबूत करू द्या . डिग्री म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात ठेवा .