Karva Chauth 2020 Puja Muhurat: 'या' शुभ मुहूर्तावर करा करवा चौथ पूजा; जाणून घ्या पूजेच्या सामानाची यादी अन् महत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 03:41 PM2020-11-04T15:41:04+5:302020-11-04T15:47:56+5:30
Karva Chauth 2020 Puja Muhurat :करवा चौथ: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत करतात.
(Image Credit- Diva Likes)
सौभाग्याचा सण करवा चौथ आज ४ नोव्हेंबर ला साजरा केला जातो. या व्रताची तयारी करण्यासाठी तसंच पूजा करण्यासाठी काही गोष्टींचे खूप महत्व असतं. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत करतात. करवा चौथला करक चतुर्थी, दशरथ चतुर्थी या नावानेही संबोधले जाते. या दिवशी महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीसह गणपती बाप्पाची पूजा केली जाते. करवा चौथचे व्रत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात पाळलं जातं. विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी हे व्रत करतात.
करवा चौथ दरम्यान पूजेच्या ताटाला खास महत्त्व आहे. या ताटात पूजेशी संबंधित सर्व आवश्यक साहित्य ठेवले जाते. जर तुम्हीही करवा चौथच्या दिवशी उपवास करणार असाल, काही गोष्टी लक्षात ठेवायाला हव्यात आज आम्ही तुम्हाला करावा चौथसाठी लागत असलेल्या सामानाची यादी सांगणार आहोत. जेणेकरून पुजेच्यावेळी सर्व साहित्य उपलब्ध होईल.
पुजेसाठी साहित्य
साहित्य ठेवण्यासाठी पूजेचं ताट, मातीचा करवा आणि झाकण, चंदन, कुंकू, रूई, अगरबत्ती, चाळणी, अक्षत, फूल, कच्चे दुध, दही, गावरान तूप, मध, मिठाई, साखर, हळद, तांदूळ, मेहेंदी, सिंदूर, कंगवा, टिकली, लाल रंगाची ओढणी, बांगड्या, आठ पुऱ्या, हलवा, दक्षिणांसाठी पैसे.
मुहूर्त
करवा चौथ व्रताच्या पूजनाचा शुभ मुहूर्त ०४ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०५ वाजून २९ मिनिटांपासून ते सायंकाळी ०६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात शहरांमधील चंद्रोदय वेळ ही वेगवेगळी असल्यामुळे त्या त्या भागातील चंद्रोदय वेळेनुसार, व्रताची सांगता करावी, असे सांगितले जात आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून महिला व्रताचा संकल्प करतात. संपूर्ण दिवसभर निर्जला व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेऊन त्यानंतरच यजमानांच्या हातून पाणी ग्रहण करून व्रताची सांगता केली जाते.