सकारात्मक विचार सुखाचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:53 AM2020-01-09T10:53:44+5:302020-01-09T10:55:31+5:30

सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

Keep Positive Thoughts Happy! | सकारात्मक विचार सुखाचा ठेवा !

सकारात्मक विचार सुखाचा ठेवा !

Next
ठळक मुद्देफिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देतेजगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणतजर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते

पूर्वी माणसाच्या गरजा या मर्यादित होत्या. माणूस सुखी व समाधानी होता. तो एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत असायचा. आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा तो आपल्या भावना इतरांसोबत व्यक्त करत असे. नुकताच ‘उबुंटु’ हा मराठी सिनेमा पाहिला. शालेय जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मनाला तो फारच भावला. ‘उबुंटु’ या शब्दाचा अर्थ ‘मी आहे कारण आम्ही आहोत’ असा आहे.

हरवत चाललेली आम्हीपणाची भावना यातून दर्शवली आहे. ही आम्हीपणाची भावना वृद्धिंगत व्हायला हवी, असे मला वाटते. 
निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केलेली आहे. सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देते, प्रेरणा देते. जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, हे तुम्हीच ठरवायचं!’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता तुम्हाला माहीत असेल. पाण्यात अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे पाहून काही जण म्हणाले ‘पेला अर्धा भरला आहे.’ काही जण म्हणाले ‘पेला अर्धा सरला आहे!’ पहिल्या प्रकारच्या लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. दुसºया प्रकाराच्या लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक होता.

जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. माणूस काही काम करत नसला तरी त्याच्या मनात सतत विचारचक्र चालूच असते. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस सतत विचार करत असतो. सकारात्मक विचार आपल्यामध्ये असणाºया क्षमता, कौशल्य यांना विविध कसोट्यांवर पारखून पाहतो. नवनिर्मिती करण्याची उमेद जागवून आनंद देऊन जातो. खरं म्हणजे प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. आशावाद हे सकारात्मक दृष्टिकोनाचे पुढचे पाऊल आहे. एखादी गोष्ट होईल, असे म्हटल्यामुळे होतेच असे नाही, पण ती गोष्ट घडण्याच्या शक्यता तरी वाढतात. 
आपल्या इच्छेसाठी कठोर परिश्रम करून संघर्ष केल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकत नाही. आपण दृढ आणि शांत असले पाहिजे. जर कोणी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा तुमचे लक्ष विचलित केले असेल तर आपण स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की, आपण जे करीत आहोत ते बरोबर आहे. बºयाच वेळा आपण काही लोकांच्या सहवासात अडकतो, जे नेहमी दुसºयाच्या आनंदात आनंद मानत नाहीत. सतत तक्रारी, वेदना उगाळत असतात. अशा व्यक्तींपासून आपण दूर राहायला हवे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचे कार्य इतके तणावपूर्ण असते की, त्याला राग येतो आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात. जर आपणातही असे घडत असेल तर स्वत: असे काम करा की, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. आपण इच्छित असल्यास, गोड संगीत, मजेदार, चांगले साहित्य इत्यादी माध्यमातून आपण आपला ताण कमी करू शकतो. बºयाच वेळा आपण काही लोकांच्या सहवासात अडकतो, जे नेहमीच त्यांच्या दु:खाच्या आरोळ्यांबरोबर बसतात. आयुष्यात कसे आनंदी राहायचे हे त्याला माहीत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले होईल. जेव्हा जेव्हा आपण निराश होता तेव्हा आपण आपल्या समूहातील काही लोकांशी मैत्री केली पाहिजे, जे आनंदी आणि उत्साही आहेत. त्यांच्या संपर्कात राहिल्यास तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळेल आणि निराशा आपल्या आयुष्यात हरवेल. आपल्या स्वभावाशी एकनिष्ठ राहणे हा सर्वात मोठा धर्म आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. हजारो अडचणी असूनही एक आनंदी मन आणि शक्तिशाली मन आपला मार्ग मोकळा करतो.
सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. चला तर मग आपण सकारात्मक विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात करूयात.
- राहुल सुरवसे 
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

Web Title: Keep Positive Thoughts Happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.