मानवी जीवनाच्या संपन्नतेचा मूलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:22 AM2020-01-22T06:22:57+5:302020-01-22T06:23:09+5:30

केवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते.

The key to prosperity | मानवी जीवनाच्या संपन्नतेचा मूलमंत्र

मानवी जीवनाच्या संपन्नतेचा मूलमंत्र

googlenewsNext

- सद्गुरू जग्गी वासुदेव

केवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते. आज जगात पुष्कळ लोक वैद्यकीयदृष्ट्या जरी रोगमुक्त असले तरी वास्तविकपणे सहसा ते आरोग्यवंत नसतात. त्यांना औषधांची गरज नसेलही पण त्यांची संपूर्ण शरीरप्रणाली परिपूर्णता अनुभवत नाही. त्यांच्यात शांती, समाधान आणि आनंदाचा अभाव असतो. तुम्हाला वाटते की नैराश्याची एक ठरावीक सीमा पार केल्यानंतरच तुम्ही स्वत:ला आजारी समजत असाल, पण मी म्हणतो जर तुम्ही आनंदाने प्रफुल्लित नसाल तर एक प्रकारे तुम्ही आजारीच आहात. म्हणजे तुमच्यात आंतरिक समन्वय आणि समतोल याचा अभाव आहे. असे घडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही कधी याकडे लक्षच दिले नाही.


सर्वकाही बाहेरून दुरुस्त करण्याची मनोवृत्ती अगोदर तुम्ही सोडून द्यावी. कुठलाही डॉक्टर किंवा औषध तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्हाला ते त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीफार मदत करू शकतात, पण आरोग्य हे आतून घडतं आणि घडायला हवं. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक पातळीशी निगडित नाही. आज आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते की, मानव म्हणजे शरीर आणि मन यांचे समान संमिश्रण आहे.

जे काही मनात घडतं त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. जे काही शरीरात घडतं त्याचे परिणाम मनावर दिसून येतात. म्हणून आपली जीवन जगण्याची पद्धत, आपली मनोवृत्ती, आपल्या भावना, आपली मूलभूत मानसिक स्थिती, दैनंदिन कार्य सक्रियता, मनाची सूत्रबद्धता एकूण या सर्व गोष्टी उत्तम आरोग्याशी संबंधित आहेत. आरोग्य जर आपल्या आतून निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या आत थोडं आंतरिक इंजिनीअरिंग करावं लागेल.
 

Web Title: The key to prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.