पितृपक्षात काय करावे, काय करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 09:44 AM2018-10-06T09:44:55+5:302018-10-06T15:25:37+5:30

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो.

know all about pitra paksh and shradh | पितृपक्षात काय करावे, काय करू नये?

पितृपक्षात काय करावे, काय करू नये?

googlenewsNext

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात. अनेकजण तर भीतीने श्राद्धच करीत नाहीत. त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून. त्यामुळे पितृपक्षात कोणत्या १० गोष्टी करू नयेत आणि कोणत्या १० गोष्टी आवर्जून कराव्यात, याची माहिती घेऊ या-

पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत -

१) संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये.

२) यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत.

३) कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये.

४) नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र, त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता.

५) घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये.

६) फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे.

७) घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये, याची काळजी घ्यावी.

८) कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा.

९) आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये.

१०) तुम्ही स्वत: श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील, तरी वरील सर्व नियम पाळावेत.

पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा -

१) श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. यात जल, तीळ, कुश, पुष्पाचा वापर करावा.

२) पितृ-श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार, ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी.

३) दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शनघेत असाल तर त्याचेही पालन करावे.

४) ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे.

५) सात्विक भोजन करावे. लसून, कांदा यांचा वापर अजिबात करू नये.

६) संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरूजनांची पूजा करावी.

७) दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी.

८) मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत.

९) घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात.

१०) घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी, भाकरी जरूर द्यावी.


- संकलन : सुमंत अयाचित

Web Title: know all about pitra paksh and shradh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.